Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 139 >> 

1हे परमेश्वरा, तू माझी परीक्षा केली आहेस, आणि तू मला जाणतोस;

2मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहीत आहे; तुला माझे विचार खूप दुरुनही समजतात.

3तू माझे मार्ग आणि मी कधी झोपतो ते बारकाईने पाहतो; तू माझ्या मार्गाशी परिचित आहे.

4हे परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा एकही शब्द तुला पूर्णपणे माहीत नाही असे मुळीच नाही.

5तू मागून व पुढून मला घेरले आहेस, आणि माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस.

6हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे; ते खूप उंच आहे, ते मी समजू शकत नाही.

7मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निसटून जाऊ शकतो? मी तुझ्या सान्निध्यापासून कोठे पळून जाऊ शकतो?

8मी जर वर आकाशात चढलो तर तिथे तू आहेस; जर मी खाली मृत्यूलोकात अंथरूण केले तरी,पाहा, तेथे तू आहेस.

9जर मी पहाटेचे पंख धारण करून आणि समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तू आहेस.

10तरी तिथेही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरुन नेतोस.

11जरी मी म्हणालो, खचित अंधार मला लपविल, आणि तर रात्रही माझ्याभोवती प्रकाशच होईल.

12काळोख देखील तुझ्यापासून काहीच लपवित नाही. रात्रही दिवसासारखीच प्रकाशते, कारण तुला काळोख आणि प्रकाश दोन्ही सारखेच आहेत.

13तू माझे अंतर्याम निर्माण केलेस; तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले.

14मी तुला धन्यवाद देतो, कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत, हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो.

15मी गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती.

16तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस; माझा एकहि दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते.

17हे देवा, तुझे विचार मला किती मोलवान आहेत, त्यांची संख्या किती मोठी आहे.

18मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त ठरतील. जेव्हा मला जागा होतो, तेव्हाहि मी तुझ्याजवळच असतो.

19हे देवा,जर तू दुष्टांना मारुन टाकशील; तर हिंसाचारी माणसांनो माझ्यापासून दूर व्हा.

20ते तुझ्याविरूद्ध बंड आणि कपटाने कृती करतात; तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात.

21तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्याविरुध्द उठणाऱ्यांचा मी का तिरस्कार करू नये?

22मी त्यांचा पूर्ण द्वेष करतो; ते माझे शत्रू झाले आहेत.

23हे देवा, माझे परीक्षण कर आणि माझे मन जाण; माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे.

24माझ्या मनात जर काही दुष्ट मार्ग असतील तर पाहा, आणि मला सनातन मार्गाने चालीव.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 139 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran