Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 132 >> 

1हे परमेश्वरा, दावीदाकरता त्याच्या सर्व दुःखांचे आठवण कर.

2त्याने परमेश्वराकडे कशी शपथ वाहिली, त्याने याकोबाच्या समर्थला कसा नवस केला, याची आठवण कर.

3तो म्हणाला “मी आपल्या घरात किंवा मी आपल्या अंथरुणात जाणार नाही.

4मी आपल्या डोळ्यांवर झोप किंवा आपल्या पापण्यास विसावा देणार नाही.

5परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या समर्थासाठी निवासमंडप सापडेपर्यंत मी असेच करीन.”

6पाहा,आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले; आम्हाला तो जारच्या रानात सापडला.

7आम्ही देवाच्या निवासमंडपात जाऊ; आम्ही त्याच्या पादासनापाशी आराधना करू.

8हे परमेश्वरा, ऊठ; तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रांतीस्थानी ये,

9तुझे याजक नीतिमत्तेचे वस्रे पांघरोत; तुझे विश्वासू आनंदाने जयघोष करोत.

10तुझा सेवक दावीदाकरीता, तू आपल्या अभिषिक्त राजापासून निघून जाऊ नकोस.

11परमेश्वराने विश्वसनीय दावीदाजवळ शपथ वाहिली आहे; तो त्याच्या शपथेपासून माघार घेणार नाही, मी तुझ्या वंशातून तुझ्या राजासनावर एकाला बसवीन.

12जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले, तर त्यांचे मुलेसुद्धा तुझ्या राजासनावर सर्वकाळ बसतील.”

13खचित परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे; त्याच्या वस्तीसाठी त्याने इच्छा धरली आहे.

14“ही जागा सर्वकाळ माझ्या विसाव्याची आहे; मी येथे राहीन, कारण माझी इच्छा आहे.

15मी तिला विपुलतेने अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन; मी तिच्या गरीबांना भाकरीने तृप्त करीन.

16मी तिच्या याजकांना तारणाचे वस्त्र नेसवीन; तिचे विश्वासू आनंदाने मोठ्याने जयघोष करतील.

17तेथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल असे मी करीन; तेथे मी आपल्या अभिषिक्तासाठी दिवा ठेविला आहे.

18मी त्याच्या शत्रूंला लाजेचे वस्रे नेसवीन, परंतु त्याचा मुकुट चमकेल.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 132 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran