Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 128 >> 

1जो प्रत्येकजन परमेश्वराचा आदर करतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्यवादित आहे.

2तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील,तू आनंदित होशील; तू आशीर्वादित होऊन आणि तुझी भरभराट होईल.

3तुझी बायको तुझ्या घरात फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या जैतूनाच्या रोपांसारखी होतील.

4होय,खरोखर, जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो तो असा आशीर्वादित होईल.

5परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो; तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमेची उन्नती तुझ्या दृष्टीस पडो.

6तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्राएलावर शांती असो.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 128 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran