Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Micah 7 >> 

1मला हायहाय! मी अस्वस्थ झालो आहे, कारण माझी स्थिती उन्हाळ्यातल्या वगळ फळांसारखी झाली आहे, काढणीच्या द्राक्षांसारखा आहे, खायला एकहि घोंस नाही, पण तरीहि प्रथम पिकलेल्या अंजीर फळाची हाव आहे.

2धार्मिक मनुष्य पृथ्वीवरून नष्ट झाला आहे, आणि मनुष्यांमध्ये कोणीहि सरळ नाही; ते सर्व रक्त पाडायला टपतात; ते प्रत्येकजण जाळे घेऊन आपल्या भावाची शिकार करतात.

3त्यांचे हात दुष्कृत्ये करण्यात पटाईत आहेत. अधिकारी पैसे मागतात व न्यायाधीश लाच तयार आहेत. सामर्थ्यवान मनुष्या दुसऱ्याला आपल्या जिवाची वाईट इच्छा बोलून दाखवतो. असे ते एकत्र येऊन योजना करतात.

4त्यांच्यातील अतिशय चांगलाही काटेरी झुडुपाप्रमाणे आहे. त्यातला अति सरळ तो कोटेरी कुंपणापेक्षा वाईट आहे. हा दिवस तुझ्या पाहारेकऱ्यांचा दिवस येतो, आता त्यांचा गोधंळ उडेल.

5कोणत्याहि शेजाऱ्यावर विश्वास ठेवू नको. मित्रावरही विश्वासून राहू नको. तुझ्या उराशी जी स्री निजते तिला देखील काही सांगू नको, तु काय बोलतो त्या बद्दल सावध राहा.

6स्वत:च्या घरातील माणसेच वैरी होतील. मुलगा वडिलांना मान देणार नाही. मुलगी आईविरुध्द जाईल. सून सासूच्या विरोधात जाईल.

7परंतू मी तर परमेश्वराकडे दृष्टी लावीन, मी आपल्या तारणाच्या देवाची वाट पाहीन, माझा परमेश्वर माझे ऐकेल.

8माझ्या शत्रूंनो, मी पडल्यावर मला हसू नका, मी तेव्हा उठेन. जेव्हा मी अंधारात बसेन तेव्हा परमेश्वर माझ्यासाठी प्रकाश होईल.

9परमेश्वर माझा वाद करील आणि माझा न्याय साधील तोपर्यंत मी त्याचा राग सहण करीन, कारण मी त्याच्याविरूद्ध पाप केले आहे. तो मला प्रकाशाकडे आणील, आणि त्याच्या न्यायीपणात त्याने मला सोडवलेले मी पाहिन.

10मग माझा शत्रू हे पाहिल; “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?” असे ज्याने मला म्हटले त्याला लाज झाकून टाकेल. माझे डोळे तिच्याकडे पाहतील, रस्त्यावरील चिखलाप्रमाने ती तुडवली जाईल.

11तुमचे तट बांधण्याचा दिवस येईल. त्या दिवसात तुझी सीमा फार विस्तारीत होईल.

12त्या दिवसांत ते अश्शूर देशातून आणि मिसर देशापासून, फरात नदीपर्यंतच्या प्रांतातून, दुरदुरच्या समुद्रतीरावून व दुरदुरच्या पर्वताकडून लोक तुझ्या कडे येतील.

13देशात राहणाऱ्या लोकांमुळे व त्यांच्या कृत्यांच्या फळांमुळे ओसाड होईल.

14म्हणून तू आपल्या लोकांस, तुझ्या वतनाचा कळप जो रानात चरतो त्याला, आपल्या काठीने पाळ. जसे ते प्राचिन दिवसांत तसे बाशानांत व गिलादांत ते चरोत.

15जेव्हा तू मिसरदेशातून बाहेर निघालास, त्या दिवसाप्रमाने त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन.

16राष्ट्रे ते चमत्कार पाहतील व आपल्या सर्व बलाविषयी लज्जित होतील. ती आपला हात आपल्या मुखाला लावतील, त्यांचे कान बहिरे होतील.

17ते सापाप्रमाणे धुळ चाटतील, भूमितल्या सरपटणाऱ्यांप्रमाणे ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर निघतील. परमेश्वर आमचा देव याच्याकडे ती भयभीत होऊन येतील, आणि ते तुझ्या मुळे घाबरतील.

18तुझ्यासारखा देव कोण आहे? जो तू पापांची क्षमा करतोस आणि आपल्या वतनाच्या उरलेल्यांचा अपराध मागे टाकतो. तो अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणार नाही, कारण त्याला दयाळू व्हायला आवडते.

19तो आम्हावर पुन्हा दया करील; तो आमच्या पापांचा आपल्या पायाखाली चुराडा करील आणि आमची सर्व पापे समुद्राच्या खोलवर फेकून देशील.

20पुरातन दिवसात आमच्या पूर्वजांशी तु ज्याविषयी शपथ वाहीली ती अशी की, तू याकोबला सत्यता आणि अब्राहामाला कराराचा विश्वासुपणा देशील.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Micah 7 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran