Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Luke 3 >> 

1आता तिबिर्य कैसराच्या कारकीर्दीच्या पंधराव्या वर्षी, जेव्हा पंतय पिलात यहूदीयाचा अधिकारी होता, आणि हेरोद गालीलचा मांडलिक असताना, आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती या देशांचा मांडलिक व लूसनिय हा अबिलेनेचा मांडलिक होता.

2आणि हन्ना व कयफा हे मुख्य याजक होते, तेव्हा अरण्यात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले.

3तो यार्देनेच्या सभोवतालच्या सर्व परिसरात पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत फिरला.

4यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हे झालेः रानांत घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी, ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.

5प्रत्येक दरी भरली जाईल, आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल, वांकडी सरळ होतील, आणि खडबडीत मार्ग सपाट केले जातील

6आणि सर्व मनुष्यप्राणी देवाचे तारण पाहतील.

7त्याच्याकडून बाप्तिस्मा करून घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणालाः “अहो, विषारी सापाच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हाला कोणी सावध केले?

8पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या, आणि आपल्या मनात असे म्हणू नका की, ‘ अब्राहाम आमच्या पित्यासारखा आहे.’ कारण मी तुम्हास सांगतो की, अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे.

9आताच झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. म्हणून प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाईल.

10नंतर जमावातील लोकांनी त्याला विचारले, आता आम्ही काय करावे?

11त्याने उत्तर दिले, ज्याच्याकडे दोन अंगरखे असतील त्याने ज्याला नाही त्याला एक द्यावा आणि ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.

12काही जकातदारही बाप्तिस्मा करून घ्यावयास आले होते. ते म्हणाले, गुरुजी, आम्ही काय करावे?

13तो त्यांना म्हणाला, तुम्हास जे नेमून दिले आहे त्यापेक्षा जास्त पैसे घेऊ नका.

14काही शिपायांनीसुध्दा त्याला विचारून म्हटले, आणि आमच्या बद्दल काय? आम्ही काय करावे? तो त्यांना म्हणाला, कोणाकडून जबरदस्तीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करू नका. तुम्हाला मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.

15तेव्हा लोक उत्सुकतेने वाट पाहत असता प्रत्येक जण आपल्या अंतःकरणात हाच ख्रिस्त असेल काय म्हणून विचार करीत असत.

16त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले; तो म्हणाला. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण एकजण जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे, आणि त्याच्या वाहाणांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील.

17त्याचे खळे अगदी स्वच्छ करायला व गहू त्याच्या कोठारात साठवायला त्याचे सूप त्याच्या हातात आहे, पण तो भूस न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.

18योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करून सुवार्ता सांगितली.

19योहानाने हेरोद या सत्ताधीशाची कानउघडणी केली. कारण त्याचे त्याच्या भावाच्या पत्नीशी-हेरोदीयाशी अनैतिक संबंध होते, तसेच इतर अनेक वाईट गोष्टी त्याने केल्या होत्या.

20हे सर्व करून सुध्दा त्याने आणखी एक दुष्कर्म केले त्याने योहानाला तुरुंगात टाकले.

21तेव्हा असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा योहाना द्वारे केला जात होता, तेव्हा येशूचा ही बाप्तिस्मा होऊन तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले.

22आणि पवित्र आत्मा देह रूपाने कबुतरा प्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की, तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुइयाविषयी फार संतुष्ट आहे.

23जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोकांना असे वाटे की, येशू योसेफाचा मुलगा आहे. योसेफ एलीचा मुलगा होता

24एली मत्ताथाचा मुलगा होता, मत्ताथ लेवीचा मुलगा होता. लेवी मल्खीचा मुलगा होता. मल्खी यन्रयाचा मुलगा होता. यन्रया योसेफाचा मुलगा होता.

25योसेफ मत्तिथ्याचा मुलगा होता. मत्तिथ्य अमोसाचा मुलगा होता. अमोस नहूमाचा मुलगा होता. नहूम हेस्लीचा मुलगा होता. हेस्ली नग्गयाचा मुलगा होता.

26नग्गय महथाचा मुलगा होता. महथ मत्तिथ्याचा मुलगा होता. मत्तिथ्य शिमयीचा मुलगा होता. शिमयी योसेखाचा मुलगा होता. योसेख योदाचा मुलगा होता.

27योदा योहानाचा मुलगा होता. योहानान रेशाचा मुलगा होता. रेशा जरुब्बाबेलाचा मुलगा होता. जरुब्बाबेल शल्तीएलाचा मुलगा होता. शल्तीएल नेरीचा मुलगा होता.

28नेरी मल्खीचा मुलगा होता. मल्खी अद्दीचा मुलगा होता. अद्दी कोसोमाचा मुलगा होता. कोसोम एल्मदामाचा मुलगा होता. एल्मदाम एराचा मुलगा होता.

29एर येशूचा मुलगा होता. येशू अलिएजराचा मुलगा होता. अलिएजर योरीमाचा मुलगा होता. योरीम मत्ताथाचा मुलगा होता. मत्ताथ लेवीचा मुलगा होता.

30लेवी शिमोनाचा मुलगा होता. शिमोन यहूदाचा मुलगा होता. यहूदा योसेफाचा मुलगा होता. योसेफ योनामाचा मुलगा होता. योनाम एल्याकीमाचा मुलगा होता.

31एल्याकीम मल्लयाचा मुलगा होता. मल्लया मिन्नाचा मुलगा होता. मिन्ना मत्ताथाचा मुलगा होता. मत्ताथ नाथानाचा मुलगा होता. नाथान दाविदाचा मुलगा होता.

32दावीद इशायाचा मुलगा होता. इशाय ओबेदाचा मुलगा होता. ओबेद बवाजाचा मुलगा होता. बवाज सल्मोनाचा मुलगा होता. सल्मोन नहशोनाचा मुलगा होता.

33नहशोन अम्मीनादाबाचा मुलगा होता. अम्मीनादाब अर्णयाचा मुलगा होता. अर्णय हेस्रोनाचा मुलगा होता. हेस्रोन पेरेसाचा मुलगा होता. पेरेस यहूदाचा मुलगा होता.

34यहूदा याकोबाचा मुलगा होता. याकोब इसहाकाचा मुलगा होता. इसहाक अब्राहामाचा मुलगा होता. अब्राहाम तेरहाचा मुलगा होता. तेरह नाहोराचा मुलगा होता.

35नाहोर सरुगाचा मुलगा होता. सरुग रऊचा मुलगा होता. रऊ पेलेगाचा मुलगा होता. पेलेग एबराचा मुलगा होता. एबर शेलहाचा मुलगा होता.

36शेलह केनानाचा मुलगा होता. केनान अर्पक्षदाचा मुलगा होता. अर्पक्षद शेमाचा मुलगा होता. शेम नोहाचा मुलगा होता. नोहा लामेखाचा मुलगा होता.

37लामेख मथुशलहाचा मुलगा होता. मथुशलह हनोखाचा मुलगा होता. हनोख यारेदाचा मुलगा होता. यारेद महललेलाचा मुलगा होता. महललेल केनानाचा मुलगा होता.

38केनान अनोशाचा मुलगा होता. अनोश शेथाचा मुलगा होता. शेथ आदामाचा मुलगा होता. आदाम देवाचा मुलगा होता.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Luke 3 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran