Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Leviticus 5 >> 

1जर एखाद्याने इतरास सांगण्यासारखी साक्ष ऐकली किंवा त्याने काही पाहिले किंवा ऐकले तर त्या बाबीसंबंधी त्याने साक्ष द्यावी; तो जर साक्ष द्यावयाचे नाकारील तर पाहिलेले किंवा माहीत असलेले न सांगण्याचे पाप केल्यामुळे तो दोषी ठरेल;

2किंवा कोणी अशुद्ध वस्तूला किंवा मेलेल्या वनपशुला किंवा अशुद्ध मानलेल्या पाळीव प्राण्याला किंवा सरपटणाऱ्या अशुद्ध प्राण्याच्या शवाला जरी नकळत शिवल्यामुळे अशुद्ध झाला तर तो दोषी ठरेल.

3त्याचप्रमाणे माणसाशी संबध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तूला नकळत शिवला व आपण अशुद्ध झालो आहो असे त्याला नंतर कळाले तर तो दोषी ठरेल.

4किंवा एखादी बरी किंवा वाईट गोष्ट करण्यासंबंधी कोणी आपल्या ओठांद्वारे अविचाराने शपथ घेतली आणि नंतर ती पूर्ण करण्यास तो विसरला; परंतु नंतर त्याला ती आठवली तर आपली शपथ पूर्ण न केल्यामुळे तो दोषी होईल.

5तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर त्याने पाप केलेली बाब कबूल करावी;

6आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वरासमोर त्याने दोषार्पण म्हणून कोकरांची किंवा करडांची एक मादी कळपातुन आणावी; आणि मग याजकाने त्या माणसाच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.

7त्याला कोकरु देण्याची ऐपत नसेल तर आपण केलेल्या पापाबद्दल त्याने दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिले परमेश्वरासमोर आणावी; त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे.

8त्याने ती याजकापाशी आणावी; मग याजकाने पहिल्याने त्यातील पापार्पण अर्पावे; त्याने पक्ष्याची मुंडी मुरगळून मोडावी परंतु ते वेगळे करु नये

9पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या भोंवती शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी निचरु द्यावे; हे पापार्पण होय.

10मग याजकाने दुसऱ्या पक्ष्याचा विधीप्रमाणे होम करावा; ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या माणसाकरिता प्रायश्चित करावे; म्हणजे त्याची क्षमा होईल

11“जर दोन होले किंवा पारव्याची दोन पिले देखील देण्याची त्याला ऐपत नसेल तर आपल्या पापाबद्दल त्याने एका एफाचा दहावा भाग मैदा पापार्पण म्हणून आणावा; त्याने त्यावर तेल घालू नये किंवा त्याच्यावर धूप ठेवू नये, कारण हे पापार्पण होय.

12त्याने तो मैदा याजकाकडे आणावा आणि याजकाने त्याच्यातून मूठभर मैदा घेऊन त्याचा स्मरणाचा भाग म्हणून परमेश्वराच्या चांगूलपणा करिता होम करावा; हे पापार्पण होय.

13अशा प्रकारे याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल; अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचा उरलेला मैदा याजकाचा होईल.”

14नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,

15“परमेश्वराची कोणतीही पवित्र वस्तू चुकून दूषित करून कोणी पापी ठरला तर त्याने दोषार्पण म्हणून तू ठरवशील तितक्या चांदीच्या शेकेलांचा दोष नसलेला मेंढा असावा, हे शेकेल पवित्र निवास मंडपातील चलना प्रमणे असावे; हे पापार्पण होय.

16ज्या पवित्र वस्तूची विटंबना करून त्याने पाप केले असेल तिची त्याने भरपाई करावी आणि तिच्या किंमतीचा पांचवा हिस्सा रक्कम त्याने याजकाला द्यावी; ह्याप्रकारे याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्या माणसाकरिता प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल.

17परमेश्वराने निषिद्ध केलेली एखादी गोष्ट करून कोणाकडून चुकून किंवा नकळत पाप घडले तर तो दोषी ठरेल; त्या पापाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.

18त्याने दोष नसलेला एक मेंढा दोषार्पणासाठी याजकापाशी आणावा; हे दोषार्पण होय, तू ठरवशील तेवढ्या किंमतीचा तो असावा अशाप्रकारे याजकाने त्या माणसाकडून नकळत घडलेल्या पापाबद्दल प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल.

19हे दोषार्पण होय परमेश्वरासमोर तो नक्कीच दोषी आहे.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Leviticus 5 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran