Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Leviticus 17 >> 

1परमेश्वर मोशेला म्हणाला,

2“अहरोन त्याचे मुलगे आणि सर्व इस्राएल लोक ह्याना सांग की परमेश्वराने आज्ञा दिली आहे तीही:

3इस्राएल घराण्यातील एखाद्या माणसाने, अर्पनासाठी छावणीत किंवा छावणीबाहेर एखादा बैल; कोकरू किंवा बकरा मारला,

4परंतु परमेश्वराच्या निवासमंडपासमोर अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपापाशी आणला नाही, तर त्या माणसाला रक्तपात केल्याचा दोष लागेल; त्याने त्या प्राण्याचा वध करून रक्त सांडले आहे म्हणून त्या माणसाला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.

5ह्या नियमाचा हेतू असा की इस्राएल लोक आपले पशू खुल्या शेतात मारतात ते त्यांनी दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणावे, व परमेश्वराकरिता शांत्यर्पणे म्हणून अर्पावे.

6याजकाने त्यांचे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या वेदीवर टाकावे आणि परमेश्वराला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा.

7आणि ह्यामुळे त्यांनी व्यभिचार मतीने ‘अजमूर्तींच्या मागे लागून त्यांना आपले यज्ञपशु अर्पण करु नयेत. हे तुम्हाला पिढ्यान् पिढ्या कायमचे विधी नियम आहेत!

8तू त्यांना सांग की इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या किंवा परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला,

9तर त्याने तो परमेश्वराला अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा; त्याने तसे न केल्यास आपल्या लोकांतून त्याला बाहेर टाकावे.

10इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी रक्त सेवन केले! तर मी त्या माणसापासून आपले तोंड फिरवीन व त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.

11कारण प्राण्याचे जीवन त्यांच्या रक्तात असते आणि तुमच्या जिवाबद्दल ते वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते तुम्हाला दिले आहे; कारण रक्तानेच प्रायश्चित होते हेच ते रक्त आहे की ज्याद्वारे जिवाचे प्रायश्चित होते.

12म्हणून मी इस्राएल लोकांना सांगतले आहे की तुमच्यातील कोणीही, तसेच तुमच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयांनीही रक्त सेवन करु नये.

13इस्राएल लोकांपैकी असो किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयापैकी असो! कोणी खाण्यास योग्य पशूची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे.

14कारण प्राणीमात्रांच्या जिवनाविषयी म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जिवन आहे ह्यामुळे मी इस्त्राएल लोकांना म्हणालो आहे की कोणत्याही प्राण्याचे रक्त सेवन करु नये, कारण सर्व प्राण्यांचे जिवन हेच त्यांचे रक्त आहे.

15“कोणी माणसाणे मग तो त्यांच्यामध्ये राहणार किंवा परदेशीय असो! तो जर मेलेल्या किंवा जंगली जनावराने मारलेल्या प्राण्याचे मांस खाईल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; म्हणजे तो शुद्ध होईल.

16त्याने आपले कपडे धुतले नाहीत किंवा स्नान केले नाहीतर तो आपल्या अपराधाबद्दल दोषी राहील, त्याने त्याबद्दल शिक्षा भोगावी.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Leviticus 17 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran