Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Hosea 5 >> 

1याजकांनो! हे एका इस्त्राएलाच्या घराण्या लक्ष दे, हे राजघराण्या एक तुमच्या सगळयांचा न्याय होणार आहे तुम्ही मिस्पा स पाश आणि ताबोरास आले झाले आहात.

2बंडखोर खोल कत्तलीत राहतात पण मी त्या सर्वांना शिस्त लावेन.

3एफ्राहमला मला माहित आहे आणि इस्त्राएल माझ्यापासून लपलेला नाही एफ्राहम तू एका वेश्येसारखा झाला आहे, इस्त्राएला अशुध्द झाला आहे.

4त्यांचे कृत्य त्यांना माझ्याकडे त्यांच्या देवाकडे परत येऊ देत नाही, कारण त्यात व्यवभिचारी आत्मा राहतो आणि ते आपला परमेश्वर यहोवास ओळखत नाही.

5इस्त्राएलाचा गर्व त्याचाच विरोधात साक्ष देतो, इस्त्राएल व एफ्राहम आपल्या अपराधात ठेचाळणार आणि यहूदा सुध्दा त्यांच्या सोबत अडखळेल.

6ते परमेश्वराचा शोध आपली मेंढरे व गुरे घेऊन करतील परंतू तो त्यांना सापडणार नाही, कारण त्याने त्याचा त्याग केला आहे.

7ते यहोवाशी अविश्वासू राहिले कारण त्यांनी अनैरस मुलांना जन्मास घातले आता चंद्रदर्शन होताच त्यास भूमीसहीत खाऊन टाकेन.

8गिबात शिंग आणि रामात तुतारी फुंका तुझ्यामागे हे बन्यामिना! असा रणशब्द बेथ अविन येथे करा.

9शासनाच्या दिवशी एफ्राहम नाश पावेल इस्त्राएलाच्या वंशास मी खात्रीने होणारी गोष्ट कळवली आहे.

10यहूदाचे पुढारी सिमेचा दगड लागवण्यासारखे आहे, मी माझा राग त्यांच्यावर पाण्यासारखा ओतणार.

11एफ्राहमाचा चुराडा झाला आहे, न्यायामध्ये त्याचा चुराडा झाला आहे, कारण त्याने मनापासून मुर्त्यांना दंडवत करण्याचे ठरवले आहे.

12हयास्तव मी एफ्राहमाला कसर आणि इस्त्राएल घराण्यास कीडी सारखा होईल.

13जेव्हा एफ्राहमाने आपला रोग आणि इस्त्राएलाने आपली जखम बघीतली तेव्हा एफ्राहम अश्शूराकडे गेला, आणि आपला दूत त्याने महान राजाकडे पाठविला पण तो त्यास आरोग्य देऊन त्यांची जखम बरी करु शकला नाही.

14हयास्तव मी एफ्राहमास सिंह आणि यहूदा घराण्यास तरुण सिंहासारखा होईल मी हो मीच त्यांना फाडून टाकीन व घेऊन जाईल आणि त्यांना सोडविणारा कोणी नसेल.

15मी आपल्या स्थानी परत जाईन, जोपर्यंत ते आपल्या दोषांची कबुली देत नाही आणि माझे मुख शोधत नाही जोपर्यंत ते आपल्या दु:खात कळकळीने माझा शोध घेत नाही.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Hosea 5 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran