Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Hosea 4 >> 

1इस्त्राएलाच्या लोकांनो, परमेश्वराचे यहोवाचा शब्द ऐका ह्या देशातील लोकांविरुध्द यहोवाचा वाद आहे कारण ह्या देशामध्ये सत्यता किंवा करारबध्द विश्वासूपणा, देवाचे ज्ञान नाही.

2तर एथे श्राप देणे, लबाड बोलणे, जिव घेणे, चोरी करणे आणि व्यभिचार करणे आहे. ह्या लोकांनी सर्व नियम मोडले आहेत व इथे रक्तपातानंतर रक्तपात होत आहे.

3म्हणून ही भूमी कोरडी पडत आहे, जो कोणी येथे राहतो तो नाश पावत आहे, रानपशू, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासेही नाही तसे होत आहेत.

4पण कुणालाही वाद घालू देऊ नका, कोणीही कोणावर आरोप न लावो, याजकांनो कारण हे तुमच्यात आहे ज्यांना मी दोष लावते.

5तुम्ही याजकांनो दिवसा तुम्ही ठेच खाल, संदेष्टे सुध्दा तुम्हाबरोबर रात्री ठेच खातील आणि मी तुझ्या आईचा नाश करेन.

6माझे लोक ज्ञान नसल्याने नाश पावत आहेत. कारण तुम्ही ज्ञानास नाकारले म्हणून मी सुध्दा तुम्हाला माझे याजक म्हणून नाकारीन. माझे तुमच्या देवाचे नियमशास्त्र तुम्ही विसरलात म्हणून मी ही तुमच्या मुलांना विसरेन.

7जसे हे याजक वाढत गेले तसे ते माझ्या विरोधात पाप करत गेले. मी त्यांचा सन्मान लाजेमध्ये बदलून टाकीन.

8ते माझ्या लोकांच्या पापावर जगतात. त्यांच्या दुष्टतेकडे त्याने मन लागलेले आहे.

9ते लोक याजकांसारखे त्यांच्या वाईट मार्गासाठी मी त्यांना शिक्षा करीन आणि त्यांच्या कृत्यांची परतफेड त्यास करीन.

10ते खातीन पण ते त्यास पुरणार नाही ते व्यभिचार करतील पण त्यांची वाढ होणार नाही कारण ते आपला देव, यहोवा, यापासून खुप दुर गेले आहेत.

11वेश्यागमन द्राक्षारस आणि नवा द्राक्षारस यांनी त्यांचा विवेक काढून घेतला आहे.

12माझे लोक त्यांच्या लाकडी मुर्तीचा सल्ला घेतात, त्यांच्या काठया त्यांना भविष्य सांगतात. गुंतागुंतीच्या आत्म्याने त्यांना बहकवले आहे, आणि त्यांनी माझ्या ज्यांच्या परमेश्वराचा त्याग केला आहे.

13ते पर्वतांच्या शिखरावर बलिदान करतात आणि टेकडयांवर धूप जाळतात, ओक हिवर आणि अल्लोनाच्या झाडाखाली कारण त्यांची सावली चांगली (छान) असते म्हणून तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्यभिचार करतात.

14तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्यवभिचार करतात तेव्हा मी त्यांना शासन करणार नाही कारण पुरुष स्वत: वेश्यांकडे जातात ते बलिदान करतात यासाठी की, त्यांना जाऊन देवदास्यांसोबत अनैतिक कृत्य करता यावे म्हणून हे विवेक हिन लोक नाश पावतील.

15हे इस्त्राएला जरी तू व्यवभिचार केला आहेस, तरी यहूदा दोषी न होवो तुम्ही लोकहो, गिल्गालास जाऊ नका, वर बेथ अवेनास जाऊ नका, परमेश्वरांच्या जिविताची शपथ खाहू नका.

16कारण इस्त्राएल हट्टी कालवडी सारखा हट्टी वागला आहे. मग यहोवा त्यास कोकरे जसे कुरणात चरतात तसा गायरानात कसा आणणार?

17एफ्राहम मुर्तीसोबत एक झाला आहे त्याला एकटे सोडा.

18जी त्यांचे जड मद्य संपले तरी ते व्यवभिचार करतच राहतात. तिच्या अधिकाऱ्यास अप्रतिष्ठा अतिप्रिय आहे.

19वारा आपल्या पंखात तिला लपेटून नेईन, आणि ते आपल्या बलिदानांमुळे लज्जित होतील.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Hosea 4 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran