Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Judges 9 >> 

1यरूब्बालाचा मुलगा अबीमलेख, याने शखेमास आपल्या आईच्या नातेवाइकांजवळ जाऊन त्यांस आणि त्याच्या आईच्या घरातील सर्व परिवाराला म्हणाला,

2तुम्ही कृपाकरून शखेमांतल्या सर्व माणसास सांगा म्हणजे ते ऐकतील, यरूब्बालाच्या सर्व सत्तर मुलांनी तुम्हावर राज्य करावे किंवा एका मुलाने तुम्हावर राज्य करावे? यांतून तुम्हाला कोणते चांगले वाटते? मी तुमच्या हाडाचा व मांसाचा आहे. याची आठवण करा

3तेव्हा त्याच्या आईचे नातेवाइक त्याविषयी शखेमांतल्या सर्व माणसांशी बोलले आणि त्यांनी अबीमेलेखास अनुसरण्याचे मान्य केले, कारण त्यांनी म्हटले, तो आमचा भाऊ आहे.

4त्यांनी त्याला बालबरीथाच्या घरातून सत्तर शेकेल रूपे दिले, आणि अबीमेलेखाने बेकायदेशीर व अविवेकी स्वभावाची माणसे भाडयाने ठेवली. यास्तव ती त्याच्यामागे चालली.

5तो अफ्रास आपल्या बापाच्या घरी गेला आणि आपले भाऊ म्हणजे यरूब्बालाचे सत्तर मुले एका दगडावर मारली; तरी यरूब्बालाचा धाकटा पुत्र योथाम राहिला, कारण तो लपलेला होता.

6मग शखेमांतली सर्व माणसे व मिल्लो वस्तीतले सर्वानी मिळून जाऊन शखेमात खो एलोन खांब त्याजवळ अबीमेलेख राजा असा करून घेतला.

7नंतर लोकानी योथामाला कळविले, तेव्हा तो गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर जाऊन उभा राहिला, आणि आपला स्वर उंच करून त्यास हक मारीत बोलला, लोकांनो देवाने तुमचे ऐकावे म्हणून तुझी माझे ऐका.

8झाडे आपल्यावर अभिषेकाने राजा करायास निघून गेली; तेव्हा त्यांनी जैतुनाला सांगितले, तू आमचा राजा हो.

9तेव्हा जैतुनाने त्यांस म्हटले, माझे तेलकटपण जेणेकरून माझ्याने देवाचा व माणसाचा सन्मान करितात, ते मी सोडून झाडांवर अधिकार करायास जावे की काय?

10नंतर त्या झाडांनी अंजिराला म्हटले तू चल, आमचा राजा हो.

11तेव्हा अंजिराने त्यांस म्हटले, मी आपली गोडी व आपले चांगले उत्पन्न सोडून झाडांवर अधिकार कारायास जावे की काय?

12नंतर त्या झाडानी द्राक्षवेलाला म्हटले, तू चल, आमचा राजा हो.

13तेव्हां द्राक्षवेलाने त्यांस म्हटले, मी आपला ताजा रस जो देवाला व मनुष्यांस संतुष्ट करितो, तो सोडून झाडावर अधिकार करायास जावे की काय?

14नंतर त्या सर्व झाडानी कांटेझुडपाला म्हटले, तू चल, आमचा राजा हो.

15तेव्हा काटेझुडपाने त्या झाडांस म्हटले, जर तुम्ही खरेपणाने मला अभिषेक करून राजा करिता, तर येऊन माझ्या छायेत स्वस्थ राहा; नाही तर काटेझुडपातून विस्तव निघून लबानोनावरल्या गंधसरूस जाळून टाकील.

16यास्तव आता जर तुम्ही खरेपणाने व शुध्दपणाने वर्त्तणूक करून अबीमेलेख राजा केला आहे, आणि यरूब्बालासी व त्याच्या घराण्यासी जर तुम्ही बरे केले आहे आणि जर त्याच्या हातांच्या उपकाराप्रमाणे त्यास केले असेल तर बरे केले आहे.

17कारण माझ्या बापाने तुमच्यासाठी लढाई केली आहे; आपला जीव धोक्यात घालून तुम्हाला, मिद्यानाच्या हातांतून सोडवले.

18परंतु तुम्ही आज माझ्या बापाच्या घरावर उठला, आणि त्याचे पुत्र सत्तर माणसे, यास तुम्ही एका शिळेवर जिवे मारिले, आणि त्याच्या दासीचा पुत्र अबीमेलेख याला शखेमांतल्या माणसांवर राजा करून ठेविले, कारण तो तुमचा भाऊ आहे.

19तर तुम्ही आजच्या दिवसी यरूब्बालाविषयी व त्याच्या घराण्याविषयी खरेपणाने व शुध्दपणाने जर वर्त्तणूक केली आहे, तर अबीमेलेखावर संतोष करा; त्यानेहि तुम्हावर संतोष करावा.

20परंतु जर तसे नाही, तर अबीमेलेखांतून विस्तव निघून शखेमांतल्या माणसांस व मिल्ली वस्तीला जाळून टाको, आणि शखेमातल्या माणसांतून व मिल्लो वस्तींतून विस्तव निघून अबीमेलेखाला जाळून टाको.

21नंतर योथाम पळून गेला व आपला भाऊ अबिमलेख ह्याच्या भीती पोटी तो बैर येथे जाऊन राहिला.

22तेव्हा अबीमेलेखाने इस्त्राएलावर तीन वर्षे अधिकार केला.

23नंतर देवाने अबीमेलेख व शखेमांतली माणसे यांमध्ये दुष्ट स्वभाव लाविला, यास्तव शखेमांतल्या माणसानी अबीमेलेखाशी दगा केला;

24जेणेकरून यरूब्बालाच्या सत्तर पुत्रांवर केलेला बलात्कार, व त्यांचा रक्तपात त्यांचा भाऊ अबीमेलेख यावर जाऊन बसावा; कारण की त्याने त्यास जिवे मारिले, आणि शखेमांतल्या माणसांवरहि बसावा; कारण त्याचे भाऊ मारण्यासाठी त्यांनी त्याला सहाय केले.

25नंतर शखेमातल्या माणसानी त्याच्यासाठी डोंगरांच्या शिखरावर दबाधारी ठेवले, आणि त्यानी आपल्याजवळून जो कोणी वाटेवर चालला, त्याला लुटले; आणि हे कोणी अबीमेलेखाला सांगितले.

26मग एबेदाचा पुत्र गाल आपल्या भावांसहीत आला, आणि ते शखेमात आल्यानंतर शखेमांतल्या माणसानी त्यावर विश्वास ठेविला.

27तेव्हा त्यानी शेतात जाऊन आपल्या द्राक्षमळ्यांची खुडणी करून द्राक्षांचा रस काढला आणि ते उत्साह करीत आपल्या देवाच्या घरी गेले, आणि खाऊन पिऊन अबीमेलेखाला शाप दिला.

28तेव्हा एबेदाचा पुत्र गाल बोलला, अबीमेलेख कोण आहे की आम्ही त्याचे दास असावे ? यरूब्बालाचा मुलगा व त्याचा कारभारी जबूल हे शेखेमाचा बाप हमोर ह्यांच्या कुळांतील लोकांचे दास असतील पण आम्ही अबीमेलेखाची सेवा का करावी?

29आणि हे लोक माझ्या हाती असते तर किती बरे होते! म्हणजे मी अबीमेलेखाला काढून टाकले असते तर त्याने अबीमेलेखाला सांगितले, तू आपले सैन्य वाढवून बाहेर ये.

30त्या वेळेस त्या नगराचा अधिकारी जबुल याने एबेदाचा पुत्र गाल याच्या गोष्टी ऐकिल्या, यास्तव त्याचा राग पेटला.

31मग त्याने कपट करून अबीमेलेखाजवळ दूत पाठवून असे सांगितले की, पाहा, एबेदाचा पुत्र गाला आपल्या भावांसोबत शखेमास आला आहे; आणि पाहा, ते तुझ्यापुढे नगराची बंदोबस्ती करितात.

32तर आता तू आपल्या जवळच्या लोकांसहीत रात्री उठून शेतात दबा धर.

33मग असे व्हावे की सकाळी सूर्य उगवताच तू उठून नगरावर हल्ला करा; मग पाहा, तो आपल्या जवळच्या लोकांसुध्दा तुझ्याजवळ बाहेर येईल, तेव्हा जसे तुझ्या हाती येईल तसे तू त्याचे कर.

34यास्तव अबीमेलेखाने आपल्याजवळच्या सर्व लोकांसहीत रात्री उठून चार टोळ्या करून शखेमावर दबा धरिला.

35मग एबेदाचा पुत्र गाल, बाहेर येऊन नगराच्या वेसीजवळ उभा राहिला, आणि अबीमेलेख आपल्याजवळच्या लोकांसोबत दबा सोडून उठला.

36तेव्हा गालाने त्या लोकांस पाहून जबुलाला म्हटले, पाहा, लोक डोंगरांच्या शिखरांवरून उतरतात. मग जबुल त्यास बोलला, तुला डोंगराची छाया मनुष्यांसारखी दिसते.

37तेव्हा गालाने फिरून असे म्हटले की, पाहा, देशाच्या उंचोट्यावरून लोक उतरतात; आणि एक टोळी मौननीमाच्या वाटेवरून येत आहे.

38मग जबुल त्याला बोलला, तू आपल्या ज्या तोंडाने बोललास, अबीमेलेख कोण की आम्ही त्याची चाकरी करावी ते आता कोठे आहे? ज्या लोकांस तू तुच्छ केले, ते हेच की नाहीत? आता मी म्हणतो, तू बाहेर जाऊन त्यांच्याशी लढाई कर.

39मग गालाने शखेमांतल्या माणसांपुढे होऊन, बाहेर जाऊन अबीमेलेखाशी लढाई केली.

40तेव्हा अबीमेलेख त्याच्या पाठीस लागला असता तो त्याच्यापुढून पळाला, आणि वेसीच्या दारापर्यंत बहुत लोक जखमी होऊन पडले.

41मग अबीमेलेख आरूम्यात राहिला, आणि गालाने व त्याच्या भावानी शखेमांत न राहावे म्हणून जबुलाने त्यांस घालवले.

42नंतर पुढल्या दिवशी असे झाले की लोक बाहेरल्या शेतांत गेले, आणि हे अबीमेलेखाला कोणीतरी सांगितले;

43तेव्हा त्याने लोक मिळवून त्यांच्या तीन टोळ्या केल्या; मग शेतात दबा धरिला, आणि त्याने न्याहाळले; तर पाहा लोक नगरांतून बाहेर आले होते, तेव्हा त्याने त्यावर चाल करून त्यांस मारले.

44त्या वेळेस अबीमेलेख आणि त्याच्यासंगती जी टोळी, ती घाला घालून नगराच्या वेसीजवळ उभी राहिली, आणि दुसऱ्या दोन टोळ्यानी शेतात जे सर्व, त्यांवर घाला घालून त्यास मारिले.

45अबीमेलेखाने तर त्या सगळ्या दिवसांत नगराशी लढाई केली, आणि त्याने नगर घेतले व त्यांत, जे लोक होते त्यास जिवे मारिले, आणि नगर उध्वस्त करून त्यावर मीठ पेरून टाकिले.

46तेव्हा शखेमाच्या बुरजांतल्या सर्व हे माणसानी ऐकिले, आणि ते बरीथ देवाच्या घराच्या बुरूजात गेली.

47मग शखेमाच्या बुरजातली सर्व माणसे एकवट झाली आहेत, असे अबीमेलेखाला कोणी सांगितले.

48तेव्हां अबीमेलेख आपल्याजवळच्या सर्व लोकांसहीत शलमोन डोंगरावर गेला, आणि अबीमेलेखाने आपल्या हाती कुऱ्हाड घेऊन झाडाची फांदी तोडिली, मग तिला आपल्या खांद्दावर उचलून घेऊन त्याने आपल्या जवळच्या लोकांस सांगितले, जे मी केले ते तुम्ही पाहिले, ते माझ्यासारखे लवकर करा.

49तेव्हां सर्व लोकांतल्या एकएकानेहि फांदी तोडून घेतली, आणि ते अबीमेलेखाच्यामागे चालले; मग त्यांनी, त्या फांद्या बरूजाला लावल्या व ते लोक आत असता बुरूजाला आग लावली; अशी शखेमाच्या बुरजातली सर्व पुरूष व स्त्रिया सुमारे एक हजार इतकी मेली.

50नंतर अबीमेलेख तेबेसास गेला, आणि त्याने तेबेजावर तळ देऊन ते घेतले.

51परंतु त्या नगरात एक मजबूत बुरूज होता, आणि सर्व पुरूष स्त्रियांसुध्दा म्हणजे त्या नगरांतली सर्व माणसे त्यांत पळून गेली आणि आपल्या मागे बंदोबस्ती करून बुरजाच्या धाब्यावर चढले.

52नंतर अबीमेलेख त्या बुरूजाजवळ येऊन त्यावर लढला, आणि बुरूजाला आग लावून जाळायास त्याच्या दाराजवळ गेला.

53तेव्हां एका स्त्रीने अबीमेलेखाची टाळू फोडाण्यास त्याच्या डोक्यावर जात्याची वरची तळी टाकिली.

54तेव्हा त्याने घाई करून आपला हत्यारे वाहणारा जो तरूण त्याला हाक मारून सांगितले, तू आपली तरवार काढून मला जिवे मार, नाही तर मजविषयी म्हणतील की बाईने त्याला मारले. यास्तव त्याच्या तरूणाने त्याला भोसकल्यावर तो मेला.

55मग अबीमेलेख मेला हे पाहून इस्त्राएली माणसे आपापल्या ठिकाणी गेली.

56तर दुष्टाई जी अबीमेलेखाने आपल्या सत्तर भावांस जिवे मारण्याने आपल्या बापाविषयी केली होती, ती देवाने त्याला उलटून लावली.

57आणि शखेमांतल्या माणसांचीहि सर्व दुष्टाई देवाने त्यांच्या मस्तकावर उलटून लाविली; याप्रमाणे थरूब्बालाचा पुत्र योथाम याचा शाप त्यांस भोवला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Judges 9 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran