Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Judges 8 >> 

1तेव्हा एफ्राइमी माणसे गिदोनास म्हणाली, तू हे आमच्याशी काय केले? तू मिद्यानाशी लढावयला गेला तेव्हा आम्हाला का बोलाविले नाही? असे ते त्याच्याशी जोरदारपणे वादविवाद करू लागली.

2तेव्हा तो त्यास म्हणाला, मी आता मी काय केले आहे त्याची तुलना तुमच्याशी करतो? एफ्राइमाच्या द्राक्षांचा सरवा हा अबियेजेराच्या द्राक्षांच्या पिकांपेक्षा चांगला नाही की काय?

3मिद्यानाचे राजपुत्र ओरेब व जेब यांच्यावर देवाने तुम्हाला विजय दिला; मी तुमच्या तुलनेत काय साध्य केले आहे? तेव्हा तो अशी गोष्ट बोलल्यावर त्यांचा त्यावरला राग नाहीसा झाला.

4गिदोन व त्याच्या बरोबर जी तीनशे माणसे होती त्यांनी यार्देनेस येऊन आणि ती ओलांडून आले. ते दमलेले असतानाहि त्यांचा पाठलाग केला.

5तेव्हां तो सुक्कोथांतल्या माणसांस म्हणाला, माझ्याबरोबरच्या लोकांस तुम्ही कृपाकरून भाकरी द्या; कारण ते दमलेले आहेत, आणि मिद्यानाचे राजे जेबाह व सलमुन्ना यांचा पाठलाग मी करत आहे.

6तेव्हां सुक्कोथाचे अधिकारी म्हणाले, काय, जेबाह व सलमुन्ना यांच्यांवर तू आधीच मात केली आहेस काय? आम्हाला माहित नाही आम्ही तुझ्या सैन्याला भाकर का द्यावी?

7तेव्हां गिदोन म्हणाला, जेव्हा परमेश्वर जेबाह व सलमुन्ना ह्यांच्यांवर मला विजय देईल तेव्हां मी रानांतल्या कांट्यानी व कुसळ्यांनी तुमचे देह फाडीन.

8नंतर तो तेथून पनुवेलास जाऊन आणि तेथल्या लोकांबरोबर त्याप्रकारे बोलला, परंतु जसे सुक्कोथांतल्या माणसानी उत्तर दिले होते, तसेच पनुवेलांतल्या माणसानी त्याला उत्तर दिले.

9तेव्हा तो पनुवेलांतल्या माणसांस असे म्हणाला, जेव्हा मी शांतीने माघारा येईन, तेव्हां मी हा बुरूज खाली ओढून टाकीन.

10तेव्हां जेबाह व सलमुन्ना कर्कोरांत होते, त्यांचे सैन्यहि त्यांच्या बरोबर होते; पूर्वेकडल्या त्यांच्या अवघ्या सैन्यांतले जे उरलेले होते ते सर्व पंधरा हजार होते; त्याच्यातले जे लढणारे एक लाख वीस हजार पुरूष तरवारीने पडले होते.

11तेव्हा गिदोन नोबाह व यागबहा यांच्या वाटेने शत्रूच्या छावणीत पूर्वेस चढून गेला; आणि त्याने शत्रूच्या सैन्याचा पराभव केला कारण त्यांना हल्ला होण्याची अपेक्षा नव्हती.

12जेबाह व जालमुन्ना हे तर पळाले, परंतु त्याने त्यांचा पाठलाग करून त्यांस पकडले, आणि त्यांच्या सर्व सैन्यात घबराहट पसरली.

13मग योवाशाचा पुत्र गिदोन हेरेशघाटावरून लढाईहून माघारा आला.

14तेव्हा त्याने सुक्कोथांतला एक तरुण माणूस धरला, आणि त्याच्याजवळ सल्ला मागितला. त्या तरुण माणसाने त्यांना सुक्कोथाचे अधिकारी आणि त्यातले वडील अशा सत्याहत्तर माणसांचे वर्णन लिहून दिले.

15मग तो सुक्कोथातल्या माणसांजवळ जाऊन बोलला, जेबाह व सलमुन्ना हे तुम्ही पाहा; याविषयी तुम्ही माझी थट्टा केली करीत बोलला, काय, जबाह व सलमुन्ना यांना आधीच जिंकले आहे काय? आम्हाला माहित नाही तुझ्या सैन्याला आम्ही भाकर कां द्यावी?

16नंतर त्याने त्या नगराच्या वडीलांना धरले, आणि रानांतल्या काटया व कुसळ्यांनी सुक्कोथातल्या माणसांस शिक्षा केली

17आणि त्याने पनुएलाचा बुरूज खाली ओढून टाकला, त्या नगरांतल्या माणसांना मारून टाकले.

18मग जेबाह व सलमुन्ना यांस तो म्हणाला, जी माणसे तुम्ही ताबोर येथे मारली ती कशी होती? तेव्हा ते बोलले, जसा तू आहेस तशीच ती होती; त्यातला प्रत्येकजण राजाच्या पुत्रा सारखा होता.

19गिदोन म्हणाला, ते माझे भाऊ, माझ्या आईचे पुत्र होते; जर तुम्ही त्यास जिवंत वाचवले असते, जसा परमेश्वर जिवंत आहे, मी तुम्हाला मारले नसते.

20तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र येथेर याला सांगितले, तू उठून त्यास मार. परंतु त्या तरुणाने आपली तरवार काढली नाही; कारण तो अजूनपर्यंत तो लहानच होता, यास्तव तो घाबरला.

21तेव्हा जेबाह व सलमुन्ना म्हणाला, तू उठून आम्हास मार, कां तर जसा पुरूष, तसे त्याचे सामर्थ्य आहे. यास्तव गिदोनाने उठून जेबाह व सलमुन्ना यास मारले, आणि त्यांच्या उंटाच्या गळ्यांमध्ये ज्या चंद्राच्या आकाराचे दागिने होते ते काढून घेतले.

22तेव्हा इस्त्राएलांतल्या माणसाली गिदोनाला सांगितले, आमच्यावर तुझ्या पुत्राने आणि तुझ्या नातवाने राज्य करावे कारण तू आम्हाला मिद्यानाच्या सत्तेतून सोडवले आहे.

23तेव्हा गिदोन त्यांस बोलला, मी तुम्हावर राज्य करणार नाही, माझा पुत्रहि तुम्हावर राज्य करणार नाही तर देव तुम्हावर राज्य करील.

24तरी गिदोन त्यास बोलला, मी तुमच्याजवळ एक मागणे करीन की तुम्ही एकएकाने आपापल्या लुटीतले कुंडले मला द्यावे. त्यांत तर सोन्याची कुंडले होती, कारण ते इश्माएली लोक होते.

25तेव्हा ते बोलले, आम्ही देतोच देतो मग त्यानी वस्त्रे पसरले, आणि त्यांतल्या एकएकाने आपापल्या लुटीची कुंडले त्यावर टाकली.

26आणि जी सोन्याची कुंडले त्याने मागितली त्यांचे सोने एक हजार सातशें शेकेल वजन होते; चंद्रकोरी व बिंदुरूप अलंकार व मिद्यांनानी राजांची जांभळी वस्त्रे याखेरीज आणि त्यांच्या उंटांच्या गळ्यांतले हार यांखेरीज तेहोते.

27तेव्हा गिदोनाने तेणेकरून याजकाचे एफोद केले, आणि आपले नगर अफ्रा यात ते ठेवले, मग सर्व इस्त्राएलानी तेथे त्याची उपासना करून व्यभिचार केला; असे ते गिदोनाला व त्याच्या घराण्याला पाशरूप झाले.

28मिद्यानाचा तर इस्त्राएलाच्या लोकांपुढे मोड झाला, आणि त्यानी आपले डोके आणखी वर केले नाही; असे गिदोनाच्या दिवसात देश चाळीस वर्षे स्वस्थ राहिला.

29योवाशाचा पुत्र यरूब्बाल तर आपल्या घरी जाऊन राहिला.

30आणि गिदोनाला सत्तर पुत्र झाले; कारण त्याला पुष्कळ बायका होत्या.

31आणि शखेमांत जी त्याची उपपत्नी होती ती त्यापासून त्याला पुत्र झाला, आणि त्याने त्याचे नाव अबीमेलेख ठेवले.

32मग योवाशाचा पुत्र गिदोन चांगल्या म्हातारपणी मेला, आणि अबीयेजरच्या अफ्रास आपला बाप योवाश याच्या कबरेत पुरण्यात.

33तेव्हा असे झाले की गिदोन मेल्यावर इस्त्राएलाच्या लोकांनी फिरून बालदेवांच्यामागे लागून व्यभिचार केला, आणि बालकरीथ आपला देव असा करून ठेवला.

34असे इस्त्राएलाच्या लोकांनी आपला देव परमेश्वर, ज्याने त्यांस त्यांच्या चहुंकडल्या सर्व शत्रूच्या हातांतून सोडवले, त्याची आठवण केली नाही.

35आणि यरूब्बाल जो गिदोन, त्याने इस्त्राएलावर जे अवघे उपकार केले होते, त्यांप्रमाणे त्याच्या घराण्यावर त्याची दया केली नाही.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Judges 8 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran