Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Judges 7 >> 

1मग यरूब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबरचे जे सर्व लोक त्यांनी सकाळी उठून हरोद झऱ्याजवळ तळ दिला, आणि मिद्यानी यांची छावणी मोरे डोंगराच्या उत्तर खोऱ्यात होती.

2तेव्हा देव गिदोनाला म्हणाला, तुझ्या बरोबर जे सैन्य आहे ते मिद्यानावर मला विजय देण्यास फारच आहेत; जेणे करून इस्त्राएल मजविरूध्द अशी बढाई मारून म्हणतील की आम्ही आमच्या सामर्थ्यानेच वाचलो.

3तर आता तू लोकांच्या कानी जाईल असे जाहीर करून सांग की, जो कोणी भित्रा आणि घाबरट आहे, त्याने मागे गिलाद डोंगरावरून निघून परत माघारी जावे. तेव्हा लोकांतून बावीस हजार परत माघारे गेले आणि दहा हजार राहिले.

4मग देव गिदोनाला म्हणाला, अद्याप लोक फार आहेत; तू त्यास खाली पाण्याजवळ ने म्हणजे मी तेथे तुझ्या बरोबर यावे तो तुझ्याबरोबर जावो, आणि ज्या प्रत्येकाविषयी मी तुला सांगेन की, याने तुझ्याबरोबर न यावे, तो न जावो.

5मग त्याने लोकांस खाली पाण्याजवळ नेले; मग परमेश्वराने गिदोनाला सांगितले, जसा कुत्रा चाटून पाणी पितो, तसा जो कोणी आपल्या जिभेने चाटून पाणी पिईल त्याला तू एकीकडे ठेव; आणि जो कोणी पाणी पिण्यास आपल्या गुडघ्यावर टेकेल त्याला एकीकडे ठेव.

6तेव्हा जे आपला हात आपल्या तोंडाकडे नेऊन चाटीत प्याले, ते पुरूष मोजले तीनशे होते, आणि बाकीचे सर्व लोक पाणी प्यावयास आपल्या गुडघ्यावर टेकले.

7नंतर परमेश्वराने गिदोनाला सांगितले, जे तीनशे पुरूष पाणी चाटून प्याले त्यांकडून मी तुम्हास सोडवीन, आणि मिद्यानला तुझ्या हाती देईन; यास्तव बाकीचे सर्व लोकांस आपल्या ठिकाणी जाऊ दे.

8तेव्हा त्या लोकांना त्यांच्या हाती अन्न पुरवठा व त्यांची रणशिंगे घेतली, आणि इस्त्राएलाचे बाकीचे सर्व माणसे त्याच्या तंबूकडे त्याने पाठवले; केवळ ते तीनशे माणसे ठेवली तेव्हा मिद्यानी तळ त्यांच्याखाली खिंडीत होता.

9आणि त्या रात्री असे झाले की परमेश्वराने त्याला सांगितले, तू उठून खाली तळावर जा, कारण मी तो तुझ्या हाती दिला आहे.

10आणि जर तू खाली जायला भितोस, तर आपला सेवक पुरा याला खाली तळाजवळ ने.

11मग ते जे बोलतील, ते तू ऐक; आणि मग तुझे हात बळकट होतील आणि तू उतरून तळावर जाशील. तेव्हा तळात जे हत्यारबंद होते, त्यांच्या काठापर्यत तो आपला सेवक पुरा याला घेऊन खाली गेला.

12तेव्हा मिद्यांनी व अमालेकी व पूर्वेकडल्या सर्व प्रजा खिंडीत टोळाच्या दाट थव्याप्रमाणे पसरल्या होत्या, आणि त्यांचे उंट मोजता येणार नाही इतके जास्त होते; ते संख्येने समुद्राच्या काठावरल्या वाळूच्या कणा इतके होते.

13मग गिदोन गेला आणि पाहा, कोणी आपल्या सोबत्याला असे स्वप्न सांगत होता की, पाहा, मी एक स्वप्न पाहिले, सातूची गोल भाकर मिद्यानी तळात घरंगळत येऊन एका तंबूपर्यंत आली आणि तिने असा जोराचा धक्का दिला की तो तंबू पडला आणि उलटा झाला जेणे करून तो सपाट झाला.

14तेव्हा त्याच्या सोबत्याने उत्तर दिले की, इस्त्राएली माणूस योवाशाचा पुत्र गिदोन याची ही तरवार तिच्याशिवाय हे काही नाही; देवाने मिद्यान व सर्व तळ त्याच्या हाती दिला आहे.

15तेव्हा असे झाले की गिदोनाने ते स्वप्न व त्याचा अर्थ ऐकल्यावर नमन करून प्रार्थना केली; मग तो इस्त्राएली तळास माघारा येऊन बोलला, तुम्ही उठा, कारण की परमेश्वराने मिद्यांनी तळ तुमच्या हाती दिला आहे.

16तेव्हा त्याने त्या तीनशे माणसांच्या विभागून तीन टोळ्या केल्या, आणि त्यांना सर्व कर्णे दिले आणि रिकामे मडके देऊन त्या मडक्यामध्ये दिवे दिले होते.

17तेव्हा त्याने त्यांस सांगितले, तुम्ही माझ्याकडे पाहा आणि मी करतो तसे करा; आता पाहा, मी छावणीच्या काठी जातो, जसे मी करतो तसे तुम्ही करा.

18म्हणजे जेव्हा मी कर्णा वाजवीन, तेव्हा, मी आणि माझ्याबरोबर असणारे सर्व संपूर्ण छावणीच्या चहुकडे कर्णे वाजवीत म्हणा, परमेश्वरासाठी व गिदोनासाठी.

19तेव्हा गिदोन व त्याच्या बरोबर असणारे जे शंभर माणसे, ती मधल्या प्रहराच्या आरंभी नुकतेच मिद्यांनानी पहारेकरी बदली करत होते, तेव्हा छावणीच्या कडेला गेला; मग त्यांनी कर्णे वाजविली, आणि आपल्या हातांतले मडके फोडले.

20असे त्या तीनहि टोळ्यांनी कर्णे वाजविली, आणि मडके फोडले; मग दिवे आपल्या डाव्या हाती आणि वाजवायाची कर्णे आपल्या उजव्या हाती धरली, आणि परमेश्वराची तरवार व गिदोनाची तरवार, अशी गर्जना केली.

21तेव्हां ते छावणीच्या चोहीकडून आपापल्या ठिकाणी उभे राहिले; आणि छावणीतले सर्व मिद्यानी लोकानी पलायन केले. ते मोठ्याने आरोळी मारीत आणि दूर पळाले.

22ती तीनशे माणसे तर कर्णे वाजवीत होती, आणि परमेश्वराने मिद्यानांच्या छावणीत प्रत्येकाची तरवार त्याच्या आपल्या साथीदारावर आणि सैन्याच्या विरूध्द चालवली; आणि सरेरा यांतली बेथशिट्टा तेथपर्यत, आणि आबेलमहोलाच्या सीमेपर्यंत टब्बाथास छावणी पळून गेली.

23मग नफताली व आशेर व मनश्श्ये यातली इस्त्राएली माणसे एकत्रित येऊन मिद्यांन्यांचा पाठलाग केला.

24गिदोनाने एफ्राइमाच्या सर्वं डोंगराळ प्रदेशातून दूत पाठवून सांगितले, तुम्ही खाली मिद्यान्याविरूध्द जाऊन आणि बेथबारापर्यत यार्देन नदी तेथवर नियंत्रण करा आणि त्यांना थांबवा; अशी सर्व एफ्राइमी माणसे बोलावली असता. त्यानी बेथबारा व यार्देन तेथवर येऊन पाण्याच्या वाटा रोखून धरल्या.

25आणि मिद्यान्याचे दोन अधिकारी ओरेब व जेब यांस त्यानी धरले; तेव्हा ओरेबाला ओरेबाच्या खडकावर मारले; असे ते मिद्यान्याच्या पाठीस लागले, आणि त्यानी आरेबाचे व जेबाचे डोके यार्देनेच्या अलिकडे गिदोनाजवळ आणले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Judges 7 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran