Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Esther 7 >> 

1तेव्हा राजा आणि हामान राणी एस्तेरकडे भोजनाला गेले.

2मेजवानीच्या या दुसऱ्या दिवशी, ते द्राक्षारस घेत असताना, राजाने पुन्हा एस्तेरला विचारले, एस्तेर राणी, तुझी विनंती काय आहे? ती मान्य केली जाईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरी त्याप्रमाणे करण्यांत येईल.

3तेव्हा एस्तेर राणी म्हणाली, राजा, माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपली मर्जी असेल तर मला व माझ्या लोकांनाही जिवदान द्यावे. एवढेच माझे मागणे आहे.

4कारण, आमचा नाश होण्यासाठी, मारले जाण्यासाठी व नाहीसे व्हावे मी आणि माझे लोक विकले गेलो आहोत. आमची नुसती गुलाम म्हणून विक्री झाली असती तरी मी गप्प राहिले असते. तरी शत्रू राजाची हानी भरून देऊ शकले नसते.

5तेव्हा राजा अहश्वेरोशाने राणी एस्तेरला विचारले, असे तुमच्या बाबतीत धाडस करणारा माणूस कोण व तो कोठे आहे?

6एस्तेर म्हणाली, तो आपल्या समोरच आहे. हाच तो दृष्ट हामान आमचा शत्रू. तेव्हा राजा आणि राणीसमोर हामान भयभीत झाला.

7राजाला अतिशय संताप आला. द्राक्षारस तसाच टाकून तो उठला आणि बाहेर राजबागेत गेला. पण हामान आपले प्राण वाचवण्याची याचना करत आत राणी एस्तेरजवळ उभा राहिला. राजाने आपले वाईट करण्याचे ठरवले आहे असे त्याने पाहिले.

8बागेतून राजा मेजवानीच्या दालनात येत असतानाच, ज्या आसनावर एस्तेर बसली होती त्यावर हामानाला पडताना राजाने पाहिले. तेव्हा संतापून राजा म्हणाला, “मी घरात असतानाच राणीवर जबरदस्ती करणार आहेस की काय?” राजा असे म्हणाल्याबरोबर सेवक आत आले आणि त्यांनी हामानाचे तोंड झाकले.

9हरबोना नावाचा राजाचा खोजा म्हणाला, “मर्दखयासाठी हामानाच्या घराजवळ पन्नास हात उंचीचा खांब उभारला आहे.” राजा म्हणाला, “ त्यावर त्यालाच फाशी द्या.”

10तेव्हा मर्दखयासाठी उभारलेल्या खांबावर हामानाला फाशी देण्यात आली. मग राजाचा क्रोध शमला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Esther 7 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran