Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Esther 6 >> 

1त्याच रात्री राजाची झोप उडाली. तेव्हा त्याने एका सेवकाला इतिहासाचा ग्रंथ आणण्याची आज्ञा केली. मग राजापुढे मोठ्याने वाचण्यात आला.

2राजा अहश्वेरोशाला राजद्वारावर पहारा करणाऱ्या बिग्थान आणि तेरेश या दोन सेवकांनी राजाचा वध करण्याचा कट रचला होता त्याच्याविषयी मर्दखयाने सांगितले होते.

3त्यावर राजाने विचारले, मर्दखयाचा त्याबद्दल सन्मान व गौरव कसा केला गेला? तेव्हा सेवक राजाला म्हणाले, त्याच्यासाठी काहीच केले गेले नाही.

4राजा म्हणाला, “ चौकात कोण आहे?” हामान तर आपण जो खांब मर्दखयाला फाशी देण्यासाठी तयार केला होता ते राजाला सांगण्यास राजाच्या घराच्या बाहेरच्या अंगणात आला होता.

5राजाचे सेवक त्याला म्हणाले, “हामान अंगणात उभा आहे” तेव्हा राजा म्हणाला, “त्याला आत घेऊन या.”

6हामान आत आला तेव्हा राजाने त्याला विचारले, ज्याचा राजाने सन्मान करावा म्हणून राजाच्या मर्जीस आल्यास त्या माणसासाठी काय करावे? हामानाने मनातल्या मनात विचार केला, माझ्यापेक्षा कोणाचा अधिक मान करावा म्हणून राजाच्या मर्जीस येणार?

7तेव्हा हामान राजाला म्हणाला, राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्यासाठी हे करावे,

8राजाने स्वतः परिधान केलेले राजवस्रे आणावे. राजा ज्या घोड्यावर बसतो तो घोडाही आणावा. राजाच्या मस्तकी ठेवतात तो राजमुकुट आणावा.

9मग राजाच्या एखाद्या महत्वाच्या अधिकाऱ्याच्या हाती राजवस्रे आणि घोडा या गोष्टी सोपवाव्यात. राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्या अंगावर या अधिकाऱ्याने ती वस्रे घालावीत आणि त्याला घोड्यावर बसवून नगरातील रस्त्यावर फिरवावे. या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला पुढे घेऊन नेताना घोषित करावे की “राजाला ज्याचा सन्मान करायचा असतो त्याच्यासाठी असे केले जाते.”

10मग राजा हामानाला म्हणाला,तू बोलला त्याप्रमाणे“लवकर वस्त्र आणि घोडा घेऊन मर्दखय यहूदी राजद्वाराजवळच बसलेला आहे त्याचे तसेच कर. जे सर्व तू बोलला आहेस त्यातले काही एक राहू देऊ नकोस.”

11मग हामानाने वस्त्र आणि घोडा घेऊन मर्दखयाला ते वस्त्र घालून त्याला घोड्यावर बसवून नगरातील रस्त्यातून फिरवले. त्याच्यापुढे चालून त्याने घोषणा दिली, “राजाला ज्याचा सन्मान करण्यास आवडते त्या मनुष्यासाठी असे केले जाईल.”

12एवढे झाल्यावर मर्दखय राजद्वाराशी परतला. पण हामान आपले तोंड झाकून शोक करीत घाईने घरी गेला.

13आपली पत्नी जेरेश आणि आपले सगळे मित्र यांना त्याने जे जे झाले ते सगळे सांगितले, हामानाची पत्नी आणि त्याला सल्ला देणारे मित्र त्याला म्हणाले, “मर्दखय यहूदी असेल तर तुझी जीत होणे शक्य नाही. तुझ्या अध:पाताला सुरुवात झाली आहे.”

14हे सगळे त्याच्याशी बोलत असतानाच राजाचे खोजे आले. एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीला हामानास आणायला घाई केली.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Esther 6 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran