Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Numbers 15 >> 

1मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,

2इस्त्राएल लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग. परमेश्वर तुम्हाला एक देश वस्ती करण्यासाठी देत आहे. तुम्ही जेव्हा तिथे पोहचाल,

3आणि तुम्ही परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे किंवा शेरडेमेंढरे यांचे परमेश्वराकरता अर्पण कराल, मग ते होमार्पणाचे असो किंवा नवस फेडण्याचा किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या सणातला तो यज्ञ असो.

4जो कोणी आपले अर्पण परमेश्वराकरता आणतो त्याने हिनाच्या एक चतुर्थाश तेलात मळलेले एफाचा दशांश सपिठ अन्नार्पण आणावे.

5प्रत्येक कोकऱ्याच्या होमार्पणाकरता किंवा यज्ञाकरता पेयार्पणासाठी एका हीनाचा एक चतुर्थाश द्राक्षारस तयार कर.

6अन्नार्पण म्हणून दर मेंढ्यामागे एक तृतीयांश हिन तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ तयार करावे.

7परमेश्वराला सुवास यावा म्हणून एक तृतीयांश हिनभर द्राक्षरसाचे पेयार्पण तयार करावे.

8जेव्हा तू परमेश्वराकरता होमार्पण किंवा नवस फेडण्यासाठी यज्ञ किंवा शांत्यर्पणाचा यज्ञ म्हणून गोऱ्हा म्हणून अर्पण करावा.

9तेव्हा अर्पण करणाऱ्याने त्या गोऱ्ह्या बरोबर अर्धां हिन तेलात मळलेल्या तीन दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे.

10तू पेयार्पणासाठी अर्धाहीन द्राक्षारस अग्नीतून केलेले अर्पण, परमेश्वराला सुवासाचे अर्पण कर.

11तुम्ही परमेश्वराला जो बैल, मेंढा, मेंढी किंवा कोकरा यांचे अर्पण कराल ते याप्रमाणे करावे.

12तुम्ही जे प्रत्येक अर्पण तयार कराल आणि ते अर्पण याप्रमाणे अर्पण करा.

13अग्नीतून केलेले अर्पण परमेश्वराला सुवासाचे असे अर्पण करताना देशात जन्मलेल्या सर्वांनी ह्या वस्तू याप्रमाणे अर्पण कराव्या.

14तुमच्याबरोबर राहत असलेल्या परदेशीयाला अथवा पिढ्यानपिढ्या तुमच्यामध्ये वस्ती करून राहिलेल्या कोणालाहि परमेश्वराकरता हे सुवासिक हव्य अर्पण करायची इच्छा झाली तर तुमच्या प्रमाणेच त्यानेहि केले पाहिजे.

15हेच नियम सर्वाना लागू आहेत. इस्त्राएलचे लोक आणि परदेशी लोक तुमच्या देशात राहतात. त्यांना हे नियम सर्वकाळ लागू राहतील. तुम्ही आणि तुमच्याबरोबर राहणारे इतर लोक परमेश्वरापुढे समान आहात.

16हे नियम व विधी तुम्हाला आणि तुमच्यात राहणाऱ्या इतरांना एकच असावा.

17परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला. तो म्हणाला,

18इस्त्राएल लोकांशी बोल व त्यांना सांग मी ज्या देशात तुम्हाला घेऊन जात आहे त्यात तुम्ही जाऊन पोहचाल.

19जेव्हा तुम्ही तेथे पिकणारे अन्न खाल तेव्हा त्यातला काही भाग समर्पण म्हणून परमेश्वराला अर्पण करा.

20मळलेल्या कणिकेची पहिली पोळी करून परमेश्वराला अर्पण करावा. तुम्ही आपल्या खळ्यातला समर्पण म्हणून जो भाग अर्पिता त्याप्रमाणे ही अर्पावी.

21मळलेल्या कणिकेतून पहिला काही भाग तुम्ही समर्पण म्हणून परमेश्वराला पिढ्यानपिढ्या द्यावा.

22जेव्हा तुम्ही परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या ह्या सर्व आज्ञेपैकी कधीतरी नकळत मोडली.

23परमेश्वराने त्या आज्ञा तुम्हाला मोशे मार्फत दिल्या आहेत त्या दिवसापासून व पुढेही तुमच्या पिढ्यानपिढ्या आहेत.

24तेव्हा असे व्हावे की, मंडळीला नकळत जर तुम्ही पाप केले, तर सर्व मंडळीने मिळून परमेश्वराला सुवास म्हणून एक गोऱ्हा होमार्पण, नियमानुसार अन्नार्पण आणि पेयार्पण करावे. तुम्ही पापार्पणासाठी बकराही अर्पण करावा.

25म्हणून याजकाने इस्त्राएलाच्या सर्व लोकांसाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याची क्षमा होईल. कारण त्यांचे पाप चुकून झाले असून त्यांनी आपल्या ह्या चुकीबद्दल आपले अर्पण म्हणजे परमेश्वराकरता हव्य आणि आपला पापबलि परमेश्वरासमोर अर्पिला आहे.

26इस्त्राएलाच्या सर्व लोकांना आणि त्यांच्यात राहणाऱ्या इतर लोकांना क्षमा केली जाईल. त्यांना क्षमा करण्यात येईल. कारण आपण चूक करीत आहोत हे त्यांना माहीत नव्हते.

27पण जर फक्त एकाच माणसाने नकळत पाप केले तर त्याने एक वर्ष वयाची बकरी आणली पाहिजे. ती बकरी पापासाठी अर्पण केली जाईल.

28त्या माणसाने चुकून परमेश्वरापुढे पाप केले. तर त्या नकळत पाप करणाऱ्या मनुष्यासाठी प्रायश्चित करायला याजकाने प्रायश्चित करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.

29जो माणूस चुकून पाप करतो त्याच्यासाठी हा नियम आहे. इस्त्राएलच्या कुटुंबात जन्मलेल्या लोकांसाठी व तुमच्यात राहणाऱ्या परदेशी लोकांसाठी सारखेच नियम आहेत.

30पण जर एखादा व्यक्ती काही कृत्य करून उघड विरोध करतो, इस्त्राएलाच्या वंशात जन्मलेल्या माणसासाठी किंवा परदेशी असो, तो परमेश्वराची निंदा करणार समजावा. त्या माणसाला आपल्या लोकांतून काढून टाकावे.

31कारण त्याने परमेश्वराचा शब्द तुच्छ मानला आहे आणि त्याने माझी आज्ञा मोडली. तर त्या व्यक्तीला पुर्णपणे तुमच्यातून काढून टाकले पाहिजे. त्याचा दोष त्याच्यावरच राहील.

32यावेळी इस्त्राएल लोक अजून वाळवंटात रहात होते. एका माणसाला जळणासाठी लाकूड सापडले म्हणून तो ते गोळा करीत होता. परंतु तो शब्बाथाचा दिवस होता. इतरांनी त्याला ते करताना पाहिले.

33ज्या लोकांनी त्याला लाकडे गोळा करताना पाहिले त्यांनी त्याला मोशे व अहरोनाकडे आणले आणि सर्व लोक भोवती गोळा झाले.

34त्यांनी त्या माणसाला तिथेच ठेवले कारण त्याला काय शिक्षा द्यायची ते त्यांना माहीत नव्हते.

35नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तो माणूस मेला पाहिजे. तेव्हा सर्व लोकांनी त्याच्यावर छावणीबाहेर दगडमार करावा.”

36म्हणून लोक त्याला छावणीबाहेर घेऊन गेले आणि त्याला दगडमार करून मारले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले.

37परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला

38इस्त्राएली वंशजाशी बोल आणि त्यांना आज्ञा कर की, त्यानी पिड्यानपिढ्या आपल्या वस्त्राच्या टोकांना गोंडे लावावे आणि प्रत्येक टोकाच्या गोंड्यावर एक निळा दोरा बांधा.

39ह्या गोंड्याचा उद्देश असा की, ते बघून परमेश्वराने दिलेल्या सगळ्या आज्ञा लक्षात ठेवाल व आज्ञा पाळाल. तुमचे ह्ददय व तुमची दृष्टी ज्यांच्यामागे जाऊन तुम्ही व्यभिचारी होत असा, त्याच्यामागे तुम्ही जाऊ नये.

40“माझ्या सगळ्या आज्ञा पाळायच्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवावे. आपल्या देवाकरता पवित्र व्हावे.

41मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्हाला मिसर देशातून आणणारा मीच आहे. तुमचा देव होण्यासाठी मी हे केले. मीच तुमचा देव परमेश्वर आहे.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Numbers 15 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran