Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Job 36 >> 

1अलीहू बोलणे चालू ठेवून म्हणाला,

2“तू मला आणखी थोडे बोलण्याची परवानगी दे कारण मला देवाच्या बाजूने आणखी बोलायचे आहे.

3मी माझे ज्ञान सगळ्यांना वाटतो देवाने मला निर्माण केले आणि देव न्यायी आहे हे मी सिध्द करेन.

4खरोखर, माझे शब्द खोटे असणार नाहीत, कोणीतरी ज्ञानाने समजूतदार असा तुम्हाबरोबर आहे.

5देव अतिशय सामर्थ्यवान आहे, पण तो लोकांचा तिरस्कार करीत नाही तो सामर्थ्यवान असून फार सूज्ञ आहे.

6तो दुष्टांना वाचवीत नाही, तर तो त्याऐवजी जे दुःखात आहेत त्यांच्यासाठी चांगले ते करतो.

7जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो. तो चांगल्या लोकांना राज्य करु देतो. तो चांगल्यांना सदैव उंच करतो.

8जर, साखळदंडानी ठेवले, जर त्यांना त्रासाच्या दोऱ्यांनी बांधून ठेवले

9आणि त्यांनी काय चूक केली ते देव त्यांना सांगेल. देव त्यांना सांगेल की त्यांनी पाप केले आहे. देव त्यांना ते गर्विष्ठ होते असे सांगेल.

10तो त्यांचे कान त्याच्या सुचना ऐकण्यास उघडतो, तो त्यांना अन्यायापासून मागे वळवतो.

11जर त्या लोकांनी देवाचे ऐकले, त्याची उपासना करतील, तर ते त्यांचे दिवस सुखाने घालतील.

12परंतु जर त्यांनी ऐकले नाही तर ते तलवारीने नाश पावतील, त्यांना ज्ञान न होता मरण येईल.

13जे लोक देवाची पर्वा करीत नाहीत ते सदा कटू (रागावलेले) असतात. देवाने जरी त्यांना बांधले तरी ते देवाकडे मदत मागायला तयार नसतात.

14ते अगदी तरुणपणी मरतील, त्यांचे जीवन कंलकीत होऊन संपेल.

15परंतु देव दु:खी लोकांना त्यांच्या दु:खातून सोडवील विपत्तीच्या द्वारे कानउघडणी करतो.

16खरोखर, त्याला तुला दुःखातून काढायला आवडते व अडचण नसलेल्या मोकळ्या जागी नेतो, आणि तुझ्या जेवणाच्या टेबलावर भरपूर पौष्टीक अन्न ठेवले असते.

17परंतु आता तुला अपराधी ठरवण्यात आले आहे, दोषारोप व न्याय तुलाच धरतात.

18तू श्रीमंतीमुळे मूर्ख बनू नकोस. लाच तुला न पकडो आणि न्यायापासून दुर घेवून जावो.

19आता तुझ्या सपंत्तीचा तुला काही नफा होईल काय, म्हणजे तू दुःखी होणार नाहीस किंवा तुझ्या सर्व सामर्थ्याचा तूला काही उपयोग होईल काय?

20दुसऱ्या विरूद्ध पाप करण्यास तू रात्र होण्याची इच्छा मनी बाळगू नकोस, लोक रात्री पसार होण्याची वेळ प्रयत्न करतात.

21काळजीपूर्वक रहा पापाकडे वळू नकोस. कारण तुझी त्रासातून परीक्षा झाली आहे, म्हणून तू पापापासुन दुर रहा.

22पाहा, देव त्याच्या सामर्थ्याने सर्वोच्च आहे. त्याच्या समान कोण शिक्षक आहे?

23त्याच्या मार्गाबद्दल त्याला कोण सुचीत करील? ‘देवा तू अयोग्य केलेस’ असे कोणी त्याला म्हणू शकत नाही.

24त्याने जे काही केले त्याबद्दल लोकांनी त्याच्या स्तुतीवर अनेक गाणी रचली आहेत.

25त्याने कार्य केले ते प्रत्येक मणुष्याला दिसते. दूरदूरच्या देशांतील लोकांनाही देवाचे महान कार्य दिसतात.

26होय, देव महान आहे परंतु त्याची महानता आपल्याला कळत नाही. आम्ही त्याच्या वर्षाची संख्या पाहाणे अशक्य आहे.

27तो पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके आणि पाऊस यात रुपांतर करतो.

28अशा रीतीने ढग पाऊस पाडतात आणि तो खूप लोकांवर पडतो.

29खरोखर, तू समजो शकतो का तो ढगांची पाखरण कशी करतो आकाशात ढगांचा गडगडाट कसा होतो?

30बघ, तो विजेला पृथ्वीवर सर्वदूर पाठवतो आणि समुद्राचा खोल भागही त्यात येतो.

31तो त्याचा उपयोग राष्ट्रांना काबूत ठेवण्यासाठी करतो आणि त्यांना भरपूर अन्न देतो.

32तो आपल्या हातांनी विजेला पकडतो आणि त्याला हवे तेथे पडण्याची तिला आज्ञा करतो.

33मेघांच्या गडगडाटामुळे वादळाची सूचना मिळते. जनावरांना सुध्दा वादळाची चाहूल लागते.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Job 36 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran