Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Job 35 >> 

1अलीहूने आपले बोलणे चालू ठेवले. तो म्हणाला,

2“तू निष्पाप आहे असा तू विचार करतोस काय? मी देवापेक्षा अधीक नितीमान आहे असा तू विचार करतोस काय?

3तू देवाला विचारतोस ‘जर मी नितीमान असण्याचा मला काय लाभ मिळेल? मी जर पाप केले नाहीतर त्यामुळे माझे काय चांगले होणार आहे?’

4मी तुला उत्तर देतो, तू आणि तुझे मित्र यांना देखील.

5वरती आकाशाकडे बघ, तुझ्यापेक्षा उंच असणाऱ्या ढगांकडे बघ.

6जर तू पाप केलेस तर त्यामुळे देवाला कसली इजा होत नाही? तुझ्याकडे पापांच्या राशी असल्या तरी त्यामुळे देवाला काही होत नाही?

7आणि तू खूप नितीमान असलास तरी तू देवाला काही देउ शकत नाहीस? तुझ्याहातून त्याला काहीच मिळत नाही?

8तुझे दुष्टपण कदाचित मनुष्याला ईजा पोहचवेल, जसा तू मणुष्य आहेस, आणि तुझे नितीमत्वाचा कदाचीत एखाद्या मणुष्याच्या पुत्राला लाभ होईल.

9पुष्कळशा वाईट कृत्यामुळे लोकांना दु:ख झाले तर ते ओरडतील. ते सामर्थ्यवान लोकांकडे जातात आणि मदतीची याचना करतात.

10परंतु कोणीही असे म्हणणार नाहीत, मला निर्माण करणारा देव कुठे आहे? जो रात्रीला गीत देतो,

11‘देवाने आम्हाला आकाशातील पशुपक्ष्यांपेक्षा शहाणे बनवले आहे तेव्हा तो कुठे आहे?’ पृथ्वीवरील जंगली प्राण्यापेक्षा जो मला अधीक शिकवतो,

12त्यामुळे त्यांनी देवाकडे मदत मागितली तरी देव त्यांना उत्तर देणार नाही कारण ते लोक अतिशय गर्विष्ठ आहेत.

13देव त्यांच्या तुच्छ याचनेकडे लक्ष देणार नाही सर्वशक्तीमान देव त्यांच्याकडे लक्ष देणार नाही.

14तेव्हा, तू जेव्हा असे म्हणशील की देव तुला दिसत नाही तेव्हा देव तुझ्याकडे लक्ष देणार नाही तर तू त्याची वाट पाहात रहा!

15तो तूला किती थोडक्यात उत्तर देईल जर तू असे म्हणालास तो क्रोधाने कोणालाही शिक्षा करीत नाही, आणि तो लोकांच्या गर्वीष्ठपणाकडे फारसे लक्ष देत नाही.

16म्हणून ईयोब मुर्खपणाचे बोलण्यासाठी त्याचे मुख उघडतो. तो ज्ञानाविना त्याचे शब्द बोलत राहतो.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Job 35 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran