Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Kings 12 >> 

1येहूच्या सातव्या वर्षी योवाश राज्या करू लागला. त्याने येरुशलेमवर चाळीस वर्षे राज्य केले. योवाशच्या आईचे नाव सिब्या, ती बैर - शेबा इथली होती.

2योवाशचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने उचित असेच होते. त्याने आयुष्यभर परमेश्वराचे ऐकले. याजक यहोयाद याने शिकवले तसे तो वागत होता.

3पण उंचवट्यावरील पुजास्थळांना त्याने धक्का लावला नाही. लोक यज्ञ करायला, धूप जाळायला तिथे जातच राहिले.

4योवाश याजकांना म्हणाला, “परमेश्वराच्या मंदिराची पवित्र वस्तूंचा जो काही येईल तो सर्व पैसा, कोणी शिरगणती झाली त्याचा पैसा, आणि परमेश्वराच्या घरात आणायला कोण्याच्या ह्रदयात योईल तो सगळा पैसा.

5याजकाने आपापल्या करदात्यांच्या कडून मिळालेले पैसे घ्यावे आणि परमेश्वराच्या मंदिरात काही मोडतोड झाली असेत तर या पैशातून तिची दुरुस्ती करावी.”

6पण यहोआश राजाच्या तेविसाव्या वर्षीही याजकांनी मंदीराची दुरुस्ती केली नाही.

7तेव्हा मात्र योवाशने यहोयाद आणि आणखी काही याजक यांना बोलावणे पाठवले. त्यांना तो म्हणाला, “अजूनही तुमच्या हातून मंदिराची दुरुस्ती का झाली नाही? आता आपापल्या लोकांकडून पैसे घेणे आणि ते पैसे वापरणे बंद करा. त्या पैशाचा विनियोग मंदिराच्या दुरुस्तीसाठीच झाला पाहिजे.”

8याजकांनी लोकाकडून पैसे घेण्याचे थांबवण्याबद्दल आपली सहमती दर्शवली खरी पण मंदिराची दुरुस्ती करायची नाही असेही ठरविले.

9तेव्हा यहोयाद या याजकाने एक पेटी घेतली आणि तिच्या झाखणाला एक भोक ठेवले. ही पेटी त्याने वेदीच्या दक्षिण बाजूला ठेवली. लोक परमेश्वराच्या मंदिरात शिरल्याबरोबर ती पेटी दाराशीच होती. काही याजक उंबरठ्यापाशीच असत आणि लोकांनी परमेश्वराला वाहिलेले पैसे ते उचलून या पेटीत टाकत.

10मग लोकही मंदिरात आल्यावर पेटीतच पैसे टाकत. राजाचा चिटणीस आणि मुख्य याजक अधून मधून येत आणि पेटीत बरेच पैसे साठलेले दिसले की ते पैसे काढून घेत. थैल्यांमध्ये भरुन ते मोजत.

11मग दुरुस्तीचे काम करणाऱ्या मजुरांना ते पैसे देत. त्यात सुतार होते तसेच परमेश्वराच्या मंदिराचे काम करणारे इतर गवंडीही होते.

12दगड फोडणारे, दगडाचे घडीव चिरे बनवणारे यांना देण्यासाठी तसेच लाकूड विकत घेणे दगड घडणे आणि दुरुस्तीचे इतर सामान विकत घेण्यासाठी हे पैसे वापरले जात.

13लोक परमेश्वराच्या मंदिरासाठी पैसे देत. पण ते चांदीची उपकरणी, कातऱ्या, वाडगे, कर्णे, सोन्या-चांदीची तबके त्या पैशातून करण्यात आले नव्हते,

14तर कारागिरांनाच ते पैसे दिले जात. त्या पैशाने ते मंदिराची दुरुस्ती करत.

15कोणीही त्या पैशाची मोजदाद केली नाही की त्या पैशाचा हिशेब कारगिरांना विचारला नाही इतके ते कारागीर विश्वासू होते.

16परंतु दोषार्पणाचा पैसा व पार्पापणाचा पैसा परमेश्वराच्या घरात त्यांनी आणला नाही, कारण तो याजकांचा होता.

17हजाएल अरामचा राजा होता. तो गथवर स्वारी करून गेला. गथचा त्याने पाडाव केला आणि तो यरुशलेमवर चढाई करायचा विचार करु लागला.

18योवाशच्या आधी त्याचे पूर्वज यहोशाफाट, यहोराम आणि अहज्या हे यहूदाचे राजे होते. त्यांनी परमेश्वराला बऱ्याच गोष्टी अर्पण केल्या होत्या. त्या मंदिरातच होत्या. योवाशनेही बरेच काही परमेश्वराला दिले होते. योवाशने ती सर्व चीजवस्तू, घरातील तसेच मंदिरातील सोने बाहेर काढले. या मौल्यवान गोष्टी त्याने अरामचा राजा हजाएल याला पाठवल्या. यरुशलेमला त्यांची भेट झाली. हजाएलने त्या शहराविरुध्द लढाई केली नाही.

19“यहूदाच्या राजांचा इतिहास” या ग्रंथात योवाशच्या थोर कृत्यांची नोंद आहे.

20योवाशच्या कारभाऱ्यांनी योवाशाविरुध्द कट केला. शिल्ला येथे जाणाऱ्या रस्तावरील मिल्लोच्या घरात त्यांनी योवाशचा वध केला.

21शिमाथचा मुलगा योजारवार आणि शोमरचा मुलगा यहोजाबाद हे योवाशचे कारभारी होते. त्यांनी हे कृत्य केले.दावीद नगरात लोकांनी योवाशला त्याच्या पूर्वजांसमवेत पुरले. योवाशचा मुलगा अमस्या त्याच्यानंतर राज्य करु लागला.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  2 Kings 12 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran