Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 John 5 >> 

1येशू हा ख्रिस्त आहे, असा जो कोणी विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला आहे. आणि जो कोणी जन्म देणाऱ्यावर प्रीती करतो. तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरहि प्रीती करतो.

2देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने.आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या मुलांवर प्रीती करतो.

3देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञापालन करणे आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.

4कारण प्रत्येक जण जो देवापासून जन्मला आहे तो जगावर विजय मिळवतो, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास.

5येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरणाऱ्याशिवाय जगावर विजय मिळविणारा कोण आहे?

6जो आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त; केवळ पाण्याद्वारेच नाही तर पाणी आणि रक्ताद्वारे आला.

7आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे.

8साक्ष देणारे तीन साक्षीदार आहेत. आत्मा, पाणी आणि रक्त, ह्या तिघांची एकच साक्ष आहे.

9जर आम्ही मनुष्यांनी दिलेली साक्ष स्वीकारतो, तर देवाने दिलेली साक्ष त्यांच्या साक्षीहून अधिक महान आहे. देवाने आपणास दिलेली साक्ष ही त्याच्या पुत्राविषयीची आहे.

10जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही, त्याने देवाला लबाड ठरवले आहे. कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही.

11आणि देवाची जी साक्ष आहे तीही आहे की, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे.

12ज्याच्याजवळ पुत्र आहे त्याला जीवन आहे पण ज्याच्याजवळ पुत्र नाही त्याला जीवन नाही.

13जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे, याविषयी तुम्हास कळावे.

14आणि आम्हाला देवामध्ये धैर्य आहे की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले करतो, तर तो आपले ऐकेल.

15आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे; म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेहि आपल्याला ठाऊक आहे.

16जर एखाद्याला त्याचा बंधूला पापात पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम मरण नसेल तर त्याने त्याच्याकरता प्रार्थना करावी आणि देव त्याला जीवन देईल. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणार्‍यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे, आणि त्यासाठी त्याने विनंती करावी असे मी म्हणत नाही.

17सर्व अनीती हे पाप आहे, पण असेही पाप आहे ज्याचा परिणाम मरण नाही.

18आम्ही जाणतो की, जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करीत रहात नाही. जो देवापासून जन्मला आहे. देव स्वतः त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्याला हात लावू शकत नाही.

19आम्हाला माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत, आणि संपूर्ण जग हे त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे.

20पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुध्दी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्याला आम्ही ओळखावे. आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.

21माझ्या मुलांनो, स्वतःला मूर्तीपूजेपासून दूर राखा.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 John 5 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran