Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Thessalonians 2 >> 

1बंधूनो, तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हालाहि माहीत आहे .

2परंतु पूर्वीं फिलिप्पैत आम्ही दुःख भोगून व अपमान सोसून, (हे तुम्हाला माहीतच आहे,) मोठा विरोध असता, देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले.

3कारण आमचा बोध फसवण्याने, अथवा अशुध्दपणा ह्यांतून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता;

4तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो; आम्ही माणसांना खूष करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खूष होईल तसे बोलतो.

5कारण आम्ही खुशामत करणारे भाषण कधी करीत नव्हतो, हे तुम्हास माहीत आहे; तसेच लोभ ठेवून ढोंगीपणाने वागलाे नाही. देव साक्षी आहे;

6आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आम्हाला आपला विशेष अधीकार चालवता आला असता तरी आम्ही माणसांपासून, तुम्हापासून किंवा दुसऱ्यांपासून गौरव मिळविण्याची खटपट करीत नव्हतो;

7तर आपल्या मुलांबाळाचे पालनपोषण करणाऱ्या आईसारखे आम्ही तुम्हामध्ये साैम्य वृत्तीचे होतो.

8आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरीता आपला जीवही देण्यास तयार होतो.

9बंधूनो, आमचे श्रम व कष्ट ह्याची आठवण तुम्हास आहे; तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुम्हापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली.

10तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांत आम्ही पवित्रतेने, नीतिने व निर्दोषतेने् कसे वागलो ह्याविषयी तुम्ही साक्षी आहात, व देवही आहे

11तुम्हास ठाऊकच आहे की, बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की,

12जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे.

13ह्या कारणांमुळे आम्हीहि देवाची निरंतर उपकारस्तुती करीतो की, तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि खरे पहाता ते असेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे.

14बंधूंनो, यहूदीयातील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूच्या ठायी आहेत त्यांचे अनुकरण करणारे झाला,म्हणजे त्यांनी यहूदयांच्या हातून जी दुःखे सोसली तशीच तुम्हीही आपल्या स्वदेशीयांच्या हातून सोसली;

15त्या यहूद्यांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाहि जिवे मारिले आणि आमचा छळ करून आम्हास बाहेर घालविले; ते देवाला संतोषवीत नाहीत व सर्व माणसांचेही विरोधी झाले आहेत;

16परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलण्यास ते मनाई करतात; हे ह्यासाठी की, त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरीत राहावे; त्यांच्यावरील क्रोधाची परिसीमा झाली आहे.

17बंधूनो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुम्हापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हास विरह दुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचा आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला;

18ह्यांमुळे आम्ही तुम्हाकडे येण्याची इच्छा धरली; मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले; परंतु सैतानाने आम्हास अडविले.

19कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समक्षतेत,त्याच्या येण्याच्या वेळेस आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुगूट काय आहे? तुम्हीच आहा ना? .

20कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहा.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Thessalonians 2 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran