Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Thessalonians 1 >> 

1देवपित्याच्या व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी असलेली थेस्सलीनीकाकरांची मंडळी हिला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून तुम्हास कृपा व शांती असो.

2आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकारस्तुती करतो.

3आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम, व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळें धरलेली सहनशीलता ह्यांची आम्ही निरंतर आठवण करतो.

4बंधूंनो, तुम्ही देवाचे प्रिय आहात,तुमची झालेली निवड आम्हास ठाऊक आहेच;

5कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने तुम्हाला कळविण्यात आली; तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हास ठाऊक आहे.

6तुम्ही फार संकटांत असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन अंगीकारुन आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला;

7अशाने मासेदोनिया व अखया - ह्यांतील सर्व विश्वासणाऱ्यांना तुम्ही उदाहरण असे झाला आहात.

8मासेदोनिया व अखया ह्यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे; इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानहि सर्वत्र पसरले आहे; ह्यामुळे त्याविषयी आम्हाला काही सांगायची गरज नाही.

9कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे, आणि जिवंत व खऱ्या देवाची सेवा करण्यास,

10आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गांतून येण्याची वाट पाहण्यास,तुम्ही मूर्तींपासून देवाकडे कसे वळलां, हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात; तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Thessalonians 1 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran