Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 22 >> 

1मग दावीद म्हणाला, “हेच ते परमेश्वर देवाचे घर आहे. इस्राएलांची होमार्पणाची वेदीही इथेच केली जाईल.”

2इस्राएलमध्ये जे परदेशी लोक राहत होते त्या सर्वाना दावीदाने त्याच्या सेवकांना आज्ञा देऊन एकत्र बोलवून घेतले. देवाचे घर बांधण्यासाठी दगडाचे चिरे घडवण्याचे काम त्यांच्यावर सोपवले.

3दावीदाने दरवाजांसाठी खिळे आणि बिजागऱ्यासाठी लागणारे लोखंड पुरवले व त्याने वजन करता येणार नाही इतके पितळ,

4सीदोन आणि सोर या नगरांतील लोकांनी गंधसरुचे पुष्कळ लाकडे दावीदाकडे आणले आणि ते लाकडे तर एवढे आले की त्यांची मोजदाद करणे कठीण होते.

5दावीद म्हणाला, “माझा मुलगा शलमोन अजून तरूण व अननुभवी आहे आणि परमेश्वराचे घर मात्र विशेषतः उत्कृष्ट बांधले गेले पाहिजे, याकरता की सर्व इतर देशात सुविख्यात आणि वैभवशाली असे झाले पाहिजे. म्हणून मी त्याच्या बांधण्याची तयारी करीन.” असे म्हणून दावीदाने आपल्या मृत्यूपूर्वी बरीच तयारी केली.

6मग त्याने आपला मुलगा शलमोन याला बोलावले. इस्राएलचा देव परमेश्वर याच्यासाठी घर बांधण्याची त्याने त्याला आज्ञा दिली.

7दावीद शलमोनाला म्हणाला "माझ्या मुला, माझा देव परमेश्वर याच्या नावासाठी घर बांधण्याची माझी इच्छा होती.

8पण परमेश्वर माझ्याकडे आला व म्हणाला, तू बऱ्याच लढाया केल्यास आणि त्यात पुष्कळ रक्त पाडले. तेव्हा तुला माझ्सासाठी मंदिर बांधता येणार नाही. कारण तू माझ्यापुढे भूमीवर पुष्कळ रक्त पाडले आहे.

9मात्र तुला मुलगा होईल तो शांतताप्रिय मनुष्य असेल. मी त्याला त्याच्या सर्व शत्रूपासून प्रत्येक बाजूने विसावा देईन. कारण त्याचे नाव शलमोन असे होईल आणि इस्राएलास त्याच्या दिवसात मी शांतता आणि स्वस्थता देईन.

10तो माझ्याप्रीत्यर्थ घर बांधील. तो माझा पुत्र आणि मी त्याचा पिता होईन. त्याचे राज्य मी इस्राएलावर सर्वकाळापर्यत स्थापित करील.

11आता माझ्या मुला, परमेश्वर तुझ्याबरोबर असो आणि तुला यशस्वी करो. त्याने तुला सांगितल्याप्रमाणे तू परमेश्वर देवाचे घर बांध.

12जेव्हा इस्राएलावर तो तुला अधिकार देईल तेव्हा परमेश्वर देवाचे नियम पाळायला फक्त परमेश्वरच तुला अंर्तज्ञान आणि समजूतदारपणा देवो.

13इस्राएलसाठी परमेश्वराने मोशेला जे नियमशास्त्र सांगितले ते तू कसोशीने पाळ म्हणजे तू यशस्वी होशील. बलवान हो व धैर्य धर. घाबरु नको किंवा निराश होऊ नको.

14पाहा, परमेश्वराच्या घरासाठी मी खूप परीश्रमाने एक लाख किक्कार सोने आणि एक किक्कार चांदी आणि पितळ व लोखंड मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. मी दगड, लाकूडसुध्दा पुरवले आहे. तू ह्या सर्वात अधिक भर घाल.

15तुझ्याजवळ पुष्कळ कामगार: पाथरवट, गवंडी आणि सुतार, आणि सर्व प्रकारच्या कामामध्ये कुशल,

16जे कोणी सोने, चांदी, पितळ, लोखंड यावर काम करू शकतात, अशी असंख्य माणसे तुझ्याबरोबर आहेत. तेव्हा आता कामाला सुरवात कर. परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.

17दावीदाने इस्राएलामधील सर्व पुढाऱ्यांनासुध्दा आपला मुलगा शलमोन याला सहकार्य करण्याची आज्ञा केली. तो म्हणाला,

18तुमचा देव परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. आणि प्रत्येक बाजूने त्याने तुम्हाला शांतता दिली आहे. कारण त्याने देशातले राहणारे माझ्या हाती दिले आहेत, परमेश्वराच्यापुढे आणि त्याच्या लोकांच्यापुढे आता हा देश ताब्यात आला आहे.

19तेव्हा आता अंत:करणपूर्वक तुम्ही परमेश्वर तुमचा देव याचा शोध करा. उठा व परमेश्वर देवाचे पवित्र मंदिर बांधा. कारण परमेश्वराच्या नावासाठी जे घर बांधायचे आहे त्यात मग परमेश्वराचा कोश आणि देवाची इतर पवित्र वस्तू आणून ठेवा.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 22 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran