Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 14 >> 

1नंतर सोराचा राजा हिराम याने दावीदाकडे दूत पाठवले आणि याखेरीज त्याने गंधसरुचे ओंडके, गवंडी, सुतार हे देखील पाठवून दिले. त्याच्यासाठी त्याने घर बांधले.

2तेव्हा, परमेश्वराने आपल्याला इस्राएलावर राजा केले आहे हे दावीदाला समजले आणि इस्राएलाच्या लोकांसाठी देवाने त्याचे राज्य उंचावले.

3यरुशलेमातल्या आणखी काही स्त्रियांशी दावीदाने लग्ने केली. आणि तो आणखी मुलांचा व मुलींचा पिता झाला.

4यरुशलेमेमध्ये जन्मलेल्या त्याच्या या मुलांची नावे अशी: शम्मुवा, शोबाब, नाथान, शलमोन,

5इभार, अलीशवा, एल्पलेट,

6नोगा, नेफेग. याफीय,

7अलीशामा, बेल्यादा, अलीफलेट.

8आता सर्व इस्राएलावर राजा होण्यासाठी दावीदाला अभिषेक केला आहे हे पलिष्ट्यांना जेव्हा कळाले तेव्हा ते दावीदाचा शोध करायला निघाले. पण दावीदाला ही बातमी कळाली तेव्हा तो त्यांच्याशी लढायला निघाला.

9आणि पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर छापे मारून त्यांना लुटले.

10मग परमेश्वरापासून सहाय्य मिळावे म्हणून दावीदाने विचारले. तो म्हणाला, “पलिष्ट्यांवर मी हल्ला करु काय? मला तू त्यांच्यावर जय देशील काय?” परमेश्वराने त्याला सांगितले “हल्ला कर, मी त्यांना तुझ्या हाती नक्कीच देईल.”

11मग दावीद आणि त्याची माणसे बाल-परासीम येथपर्यत जाऊन पोचली आणि तेथे त्यांने त्यांचा पराभव केला. तो म्हणाला, “परमेश्वर पुराच्या पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या हाताने माझ्या शत्रूवर तुटून पडला आहे.” त्या ठिकाणाचे नाव बाल परासीम असे पडले आहे.

12पलिष्ट्यांनी आपली देव तिथेच टाकले. आणि दावीदाने त्या मूर्ती जाळून टाकण्याची आज्ञा दिली.

13रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला.

14दावीदाने पुन्हा देवाला मदतीसाठी विचारले. देवाने त्याला म्हणाला “तू त्यांच्यावर हल्ला करायला जाशील तेव्हा समोरुन नकोस तर वळसा घेऊन तुतीच्या झाडांसमोर त्याच्यावर चालून जा.

15तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून तुला सैन्य चाल करून जाण्याचा आवाज ऐकशील लागेल. तेव्हा हल्ला चढव. कारण देव पलिष्ट्यांवर हल्ला करायला पुढे निघाला आहे.”

16दावीदाने देवाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाने आपल्या लोकांसह पलिष्ट्यांचा पाडाव केला. गिबोनपासून गेजेपर्यंत त्यांनी पलिष्ट्यांच्या सैन्याला झोडपून काढले.

17त्यामुळे दावीदाची कीर्ती सर्व देशात पसरली. परमेश्वराने सर्व राष्ट्रांत त्याची दहशत निर्माण केली.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  1 Chronicles 14 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran