Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Zechariah 13 >> 

1त्या दावीदाच्या वंशासाठी आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्या इतर लोकांसाठी पापे धुण्यासाठी आणि त्यांना शुध्द करण्यासाठी पाण्याचा नवा झरा फुटेल.

2सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “त्यावेळी देशांतील सर्व मूर्तींचे मी उच्चाटन करीन. लोकांना त्यांची नावेसुध्दा आठवणार नाहीत. मी ढोंगी संदेष्ट्यांचा आणि अशुध्द आत्म्यांचा नायनाट करीन.

3एखाद्याने भविष्य वर्तविणे चालूच ठेवले, तर त्याला शिक्षा केली जाईल. त्याचे आई-वडील ज्यांनी त्याला जन्म दिला ते त्याला म्हणतील, ‘परमेश्वराच्या नावाने तू खोटे बोललास तेव्हा तुला मरणाशिवाय गत्यंतर नाही.’ भविष्य वर्तविल्याबद्दल त्याचे आई-वडील त्याला भोसकतील.

4त्यावेळी प्रत्येक संदेष्ट्यांला स्वत:च्या दृष्टान्तांची आणि संदेशाची लाज वाटेल; आणि लोकांना फसवण्यासाठी ते केसांचा झगा घालणार नाहीत.

5तेव्हा तो म्हणेल, ‘मी संदेष्टा नाही. मी शेतकरी आहे मी लहानपणापासून शेतीच करीत आलोय.’ असे ते सांगतील.

6पण इतर लोक त्याला विचारतील, ‘मग तुझ्या हातावर जखमा कसल्या?’ तेव्हा तो उत्तर देईल, ‘मित्राच्या घरात मला लागलेल्या माराचे हे व्रण होत!”

7सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “हे तलवारी, माझ्या मेंढपाळांवर प्रहार कर व माझ्या मित्रावर वार कर; मेंढपाळावर वार कर म्हणजे मेंढरे पळून जातील आणि मी त्या लहान जीवांना शिक्षा करीन.

8परमेश्वर असे म्हणतो, ते देशाचे दोन भाग नष्ट करतील आणि त्याचा तिसरा भाग मागे शेष राहील.

9त्या तिसऱ्या भागाला मी अग्नीत टाकील, आणि चांदीला शुद्ध करताता तसे त्यांना शुद्ध करीन; सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन. ते माझा धावा करतील आणि मी त्यांना प्रतिसाद देईन. मी म्हणेण, ‘हे माझे लोक आहात.’ आणि ते म्हणतील, ‘परमेश्वर माझा देव आहे.’”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Zechariah 13 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran