Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Jonah 2 >> 

1नंतर माश्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली

2तो म्हणाला, मी आपल्या आपत्तीमुळे परमेश्वराला हाक मारली, आणि त्याने मला उत्तर दिले; मी मृतलोकाच्या पोटातून मदतीसाठी हाक मारली तू माझा आवाज ऐकला.

3तू मला समुद्रांच्या मध्यभागी खोल टाकले, आणि प्रवाहाने मला वेढले, तुझ्या सर्व उसळत्या लाटांचा कल्लोळ माझ्यावरून गेला.

4आणि मी म्हणालो, मी तुझ्या दृष्टीसमोरून टाकलेला आहे; तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन?

5पाण्याने माझा प्राण जाईपर्यंत झाकले; आणि डोहाने सर्वबाजूनी मला घेरले, समुद्रातील शेवाळाने माझ्या डोक्याला लपेटले.

6मी पर्वतांच्या तळापर्यंतखाली गेलो; पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले; तथापि परमेश्वर माझ्या देवा, तू माझा जीव खड्डयातून वरती काढला आहे.

7जेव्हा माझा जीव माझ्या ठायी व्याकुळ झाला; तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले. आणि माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात पोहचली.

8जे निरर्थक देवाकडे आपले चित्त लावतात, ते स्वतः आपल्या विश्वासाला नाकारतात.

9परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझ्याकडे यज्ञ अर्पण करीन; जो नवस मी केला आहे तो मी पूर्ण करीन, तारण परमेश्वराकडूनच आहे.

10मग परमेश्वराने त्या माश्याशी बोलला; तेव्हा त्याने योनाला कोरडया भूमीवर ओकून टाकले.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Jonah 2 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran