Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Isaiah 12 >> 

1त्या वेळेला तू म्हणशील: “परमेश्वरा, मी तुझे स्तवन करतो तू माझ्यावर रागावला होतास पण आता राग सोड तुझ्या प्रेमाची प्रचिती दे.”

2देव माझा तारक आहे माझी त्याच्यावर श्रध्दा आहे. मी निर्भय आहे तो मला तारतो. परमेश्वर हीच माझी शक्तीआहे. तो मला तारतो म्हणूनच मी त्याचे स्तुतिस्तोत्र गातो.

3तारणाच्या झऱ्यातून तुम्ही पाणी घ्या म्हणजे सुखी व्हाल आणि म्हणाल, “परमेश्वराची स्तुती असो. त्याच्या नावाची उपासना करा. त्याच्या करणीची माहिती लोकांना सांगा.”

4म्हणजे सुखी व्हाल आणि म्हणाल, “परमेश्वराची स्तुती असो. त्याच्या नावाची उपासना करा. त्याच्या करणीची माहिती लोकांना सांगा.”

5परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा कारण त्याने महान कार्य केले आहे. देवबाद्दल ही वार्ता सर्व जगात पसरवा सर्व लोकांना हे कळू द्या.

6सीयोनवासीयांनो, तुम्ही गजर करा. कारण इस्राएलचा एकमेव पवित्र देव समर्थपणे तुमच्यामध्ये आहे. तेव्हा आनंदी व्हा.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Isaiah 12 >> 


Bible2india.com
© 2010-2026
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran