Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 2 >> 

1“मानवाच्या मुला” ती वाणी मला म्हणाली आपल्या पायांवर उभा रहा; मग मी तुझ्याशी बोलेन.

2जेव्हा ती वाणी माझ्याशी बोलतांना आत्म्याने मला माझ्या पायावर उभे केले आणि मी त्याला माझ्याशी बोलतांना ऐकले.

3इस्त्राएलाच्या लोकांजवळ “मानवाच्या मुला” मी तुला पाठवत आहे ती वाणी मला म्हणाली. बंडखोर देशा जवळ ज्या राष्ट्रांनी माझ्याशी बंड केले-पहील्यापासून त्यांनी आणि त्यांच्या पुर्वीच्या पिढ्यांनी माझ्या विरुध्द पाप केले आहे!

4त्यांच्या पुर्व पिढीचे लोक हट्टी आणि कठीण मनाचे होते, मी तुला त्यांच्या जवळ पाठवत आहे. आणि हे यहोवा देव त्यांच्याशी बोलत आहे असे त्यांना तू सांग.

5ते तुझे ऐकतील किंवा ऐकणार नाही. ते फितुर झालेले राहात आहे परंतू संदेष्टा त्यांच्या कडे आला होता असे त्यांना कदाचित कळुन येईल.

6त्यांच्या भवती काटे विंचवांनी व त्यांच्या शब्दांनी “मानवाच्या मुला” भयभीत होऊ नको; त्यांच्या तोंडाकडे बघुन तू गोंधळुन जाऊ नको पहील्यापासुन ते फितुर आहेत.

7पण तू माझा शब्द त्यांना सांग; ते तुझे ऐको किंवा न ऐको कारण ते फार फितुर आहेत.

8परंतू मी जे तुला “मानवाच्या मुला” बोलायला सांगत आहे ते ऐक त्या फितूर जातीच्या लोकांसारखे फितूर होऊ नको. आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा!

9माझ्या कडे एक हात येत आहे असे मी पाहीले; तो लीखित चर्मपत्र होता.

10तो माझ्या पुढे लांबवर पसरत आला; त्यांच्या मागे पुढे दुःख, आकांताचा लेख लिहला होता.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Ezekiel 2 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran