Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 59 >> 

1देवा, मला माझ्या शत्रूंपासून वाचव माझ्याशी लढायला जे लोक आले आहेत त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी मला मदत कर.

2वाईट कृत्ये करणाऱ्यांपासून मला वाचव. मला त्या खुन्यांपासून वाचव.

3बघ, ते बलवान लोक माझी वाट पहात आहेत. ते मला मारण्यासाठी थांबले आहेत. परंतु मी पाप केले नाही किंवा कुठला गुन्हा केला नाही.

4ते माझा पाठलाग करीत आहेत परंतु मी काहीही चूक केली नाही. परमेश्वरा, ये आणि स्वत:च बघ.

5तू सर्वशक्तिमान परमेश्वर आहेस. इस्राएलचा देव आहेस. ऊठ आणि त्या लोकांना शिक्षा कर. त्या दुष्ट देशद्रोह्यांना अजिबात दयामाया दाखवू नकोस.

6ते दुष्ट लोक संध्याकाळच्या वेळी गावात येणाऱ्या कुत्र्यांसारखे गुरगुरत आणि शहरातून फिरत येतात.

7त्यांच्या धमक्या आणि अपमानित करणारे शब्द ऐक. ते अतिशय दुष्ट गोष्टी बोलतात आणि कुणी ते ऐकेले याची त्यांना पर्वा नसते.

8परमेश्वरा, त्यांना हास, त्या सर्वांचा उपहास कर.

9देवा, तू माझी शक्ती आहेस. मी तुझी वाट पाहात आहे देवा, तू माझी उंच पर्वतावरील सुरक्षित जागा आहेस.

10देव माझ्यावर प्रेम करतो. आणि तो मला जिंकण्यासाठी मदत करतो. तो मला माझ्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी मदत करील.

11देवा, तू त्यांना फक्त मारुन टाकू नकोस नाहीतर माझे लोक त्यांना विसरुन जातील. माझ्या रक्षणकर्त्या तू त्यांची दाणादाण उडव आणि तुझ्या शक्तीने त्यांचा पराभव कर.

12ते दुष्ट लोक शाप देतात आणि खोटे बोलतात. ते ज्या गोष्टी बोलले त्याबद्दल त्यांना शिक्षा कर. त्यांचा अंहकार त्यांना सापळ्यात अडकवू दे.

13रागाने तू त्यांचा नाश कर, त्यांचा सर्वनाश कर.नतंर लोकांना कळेल की देव याकोबाच्या लोकांवर आणि सर्व जगावर राज्या करतो.

14ते दुष्ट लोक गुरगुरणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे रात्री शहरातून हिंडत येतात.

15ते खाण्यासाठी अन्न शोधतील पण त्यांना काही मिळणार नाही आणि झोपायला जागाही मिळणार नाही.

16परंतु मी तुझी स्तुती करणारे गाणे गाईन. रोज सकाळी मी तुझ्या प्रेमाचा आनंद घेईन का? कारण तू माझी उंच पर्वतावरची सुरक्षित जागा आहेस आणि संकटात मी तुझ्याकडे धाव घेऊ शकतो.

17मी तुझे गुणवर्णन करणारे गाणे गाईन. का? कारण तू माझी उंच पर्वतावरील सुरक्षित जागा आहेस. माझ्यावर प्रेम करणारा देव तूच आहेस.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 59 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran