Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 149 >> 

1परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराला नवे गीत गा; विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा.

2इस्राएल आपल्या राष्ट्र निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. सियोनेचे लोक आपल्या राजात आनंद करो.

3ती त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; ती त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो.

4कारण परमेश्वर आपल्या लोकांत आनंद घेत आहे; तो विनम्रांना तारणाने गौरवितो.

5भक्त विजयाने हर्षभरित होवोत; ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो.

6देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो आणि दुधारी तरवार त्यांच्या हातात असो.

7यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा आणि लोकांना शिक्षा करावी.

8ते त्यांच्या राजांना साखळंदडाने आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील.

9ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील. हा त्याच्या सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आदर आहे. परमेश्वराची स्तुती करा


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 149 >> 


Bible2india.com
© 2010-2026
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran