Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 111 >> 

1परमेश्वराची स्तुती करा. सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी परमेश्वराला अगदी मनापासून धन्यवाद देईल.

2परमेश्वराचे कार्य महान आहेत, जे सर्व त्याची आवड धरतात ते उत्सुकतेने त्याची प्रतीक्षा करतात.

3त्याचे कार्य ऐश्वर्यशाली आणि वैभवशाली आहे, आणि त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते.

4त्याचे आश्चर्यकारक गोष्टी आठवणीत राहतील असे केले; परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे.

5तो आपल्या विश्वासणाऱ्यांना अन्न देतो. तो आपला करार नेहमी आठवतो.

6त्याने आपल्या लोकांस राष्ट्रांचे वतन देऊन आपली सामर्थ्याची कार्ये दाखवली आहेत.

7त्याच्या हातचे कार्य सत्य व न्याय्य आहे; त्याचे सर्व विधी विश्वासनीय आहेत.

8ते प्रामाणिकपणाने आणि योग्य रीतीने नेमिलेले आहेत, ते सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.

9त्याने आपल्या लोकांना विजय दिला आहे; त्याने आपला करार सर्वकाळासाठी ठरवला आहे, देवाचे नाव पवित्र व भीतिदायक आहे.

10परमेश्वराचे भय शहाणपणाची सुरुवात आहे; जे त्याप्रमाणे वागतात त्यास सुबुद्धी प्राप्त होते. त्याची स्तुति सर्वकाळ टिकून राहील.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Psalms 111 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran