Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Malachi 4 >> 

1“कराण पाहा, तो दिवस येत आहे, तो भट्टीसारखी जळतो, आणि सर्व गर्विष्ठ आणि प्रत्येक दुष्ट धसकट बनतील. येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, म्हणजे एकही फांदी वा मूळ शिल्लक ठेवले जाणार नाही.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.

2“परंतु जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरता त्या तुम्हांसाठी न्यायीपणाचा सुर्य उगवेल. आणि त्याच्या पंखात निरोगी करण्याचा उपाय आहे. मग तुम्ही गोठ्यातून सुटलेल्या वासरांप्रमाणे, मुक्त व आनंदी व्हाल.

3तुम्ही दुष्टांना तुडवाल, कारण मी हे करील त्या दिवशी ते तुमच्या तळपायाखाली राख होतील.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.

4“मोशे जो माझा सेवक होता त्याला होरेबात सर्व इस्राएलासाठी जे नियमशास्र मी आज्ञापिले ते, म्हणजे नियम व न्यायहि तुम्ही आठवा.”

5“पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येईल त्यपूर्वी मी एलीया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीन. देवाच्या न्यायदानाच्या भयंकर मोठ्या वेळेपूर्वी तो येईल.

6आणि तो बापाचे हृदय मुलांकडे, आणि मुलांचे हृदय त्यांच्या बापाकडे फिरवील, नाहीतर मी कदाचित येईन आणि तुमच्या भुमीला शापाने मारीन.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Malachi 4 >> 


Bible2india.com
© 2010-2026
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran