Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Acts 7 >> 

1प्रमुख याजक म्हणाला, "ह्या गोष्टी अशाच आहेत काय?"

2तेव्हा तो म्हणालाः बंधुजनहो व वडिलांनो, ऐका, आपला पूर्वज अब्राहाम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता "गौरवशाली देवाने"त्याला दर्शन देऊन म्हटले,

3"तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात जा."

4तेव्हा तो खास्द्यांच्या देशातून निघून हारानात जाऊन राहिला; मग त्याचा बाप मेल्यावर देवाने त्याला तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले;

5पण त्यांत त्याला वतन दिले नाही, पाऊल भर देखील जमीन दिली नाही; त्याला मूलबाळ नसताही देवाने त्याला अभिवचन दिले की, हा देश तुला व तुझ्यामागे तुझ्या संततीला वतन असा देईल.

6देवाने आणखी असे सांगितले की, 'त्याची संतती परदेशात जाऊन काही काळ राहतील आणि ते लोक त्यांना दास करून चारशे वर्षे वाईटाने वागवतील.

7ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्यांचा न्याय मी करीन, ' आणि त्यानंतर ते तेथून निघून 'ह्या' स्थळी माझी उपासना करतील, 'असे देवाने म्हटले.

8त्याने अब्राहामाला 'सुंतेचा करार'लावून दिला; हा करार झाल्यानंतर अब्राहामाला इसहाक झाला; त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली; मग इसहाकाला याकोब झाला व याकोबाला बारा कुलपती झाले.

9नंतर कुलपतींनी 'हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले; 'पण 'देव त्याच्याबरोबर होता'

10त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटातून सोडवले आणि 'मिसर देशाचा राजा फारो याच्यासमोर त्याला कृपापात्र व ज्ञानी असे केले; म्हणून फारोने त्याला मिसर"देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले.

11मग सर्व मिसर व कनान ह्या देशात दुष्काळ पडून त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले.