Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Leviticus 12 >> 

1परमेश्वर मोशेला म्हणाला,

2इस्राएल लोकांना सांग, जर स्त्री गर्भवत होऊन तिला मुलगा झाला तर तिने सात दिवस अशुद्ध राहावे; मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते तशीच ती अशुद्ध समजावी.

3आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी.

4नंतर त्या स्त्रीला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहतीस दिवस लागतील; त्या मुदतीत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला शिवू नये व पवित्रस्थानात जाऊ नये.

5परंतु जर तिला मुलगी झाली तर मासिक पाळीच्या काळात जशी ती असते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध राहावे; तिला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस लागतील.

6तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धी होण्याची वेळ पुर्ण झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचे कोकरु आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला आणून दर्शनमंडपापाशी याजकाकडे द्यावीत.

7मग याजकाने ते परमेश्वरासाठी अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती आपल्या रक्तस्त्रावापासून शुद्ध होईल; मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्री विषयी हे नियम आहेत.

8तिला कोकरु अर्पिण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले, एक होमार्पणासाठी व दुसरा एक पापार्पणासाठी आणावी मग याजकाने तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती शुद्ध होईल;


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Leviticus 12 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran