Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Joshua 15 >> 

1यहूदी वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे नेमून दिलेला जो भाग चिठ्या टाकून मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला आहे.

2आणि त्यांची दक्षिण सीमा क्षारसमुद्राच्या शेवटची खाडी, जिचे तोंड दक्षिणेस आहे, तेथून झाली.

3ती तशीच अक्राब्बीम नांवाच्या चढणीच्या दक्षिणेकडे जाऊन सीन रानाच्या कडेने कादेशबर्ण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्रोनाजवळून अद्दारावरून जाऊन कर्काकडे वळली आहे.

4आणि ती असमोना जवळून मिसरी नदीस गेली; नंतर तिचा शेवट पश्चिम समुद्रा नजीक आहे; अशी तुमची दक्षिण सीमा व्हावी.

5आणि पूर्वेची सीमा क्षासमुद्रावरुन यादेनेच्या मुखापर्यंत आहे; आणि उत्तरेस कोपऱ्याची सीमा समुद्राच्या कांठी यार्देनेचा मुखाजवळील समुद्राची खाडी तेथून आहे.

6मग ती सीमा तेथपर्यंत चढून जाऊन बेथअराबाच्या उत्तरेस जाते; नंतर ती सीमा रऊबेनाचा पुत्र बोहन याची धोंड तेथवर चढून गेली;

7मग ती सीमा आखोर खोऱ्यापासून दबीरापर्यंत चढून जाऊन उत्तरेस गिलगालकडे वळली; ते अदुम्मीमाच्या चढणीसमोर, ती नदी दक्षिणेस आहे; नंतर ती सीमा एनशमेशाच्या पाण्याकडे गेली, आणि तिची शेवट एन रोगेलापर्यंत होता.

8मग ती सीमा हित्रोमाच्या पुत्राच्या खिंडीजवळून यबूसी म्हणजे यरुशलेम त्याच्या दक्षिण भागास चढून जाती; नंतर पश्चिमेस हिन्नोम खिंडीच्या समोर जो डोंगर, जो रेफाईमांच्या उत्तरेस आहे, खोऱ्याच्या शेवटी शिखरावर सीमा चढून गेली.

9मग डोंगराच्या शिखरापासून नेफ्तोहाच्या पाण्याच्या झऱ्यापर्यंत सीमा पुढे गेली; आणि एफ्रोन डोंगरावरल्या नगरात जाऊन, बाला म्हणजेच किर्याथ यारीम तिकडे ती सीमा पुढे गेली,

10मग बालापासून ती सीमा पश्चिमेस सेईर डोंगराकडे फिरून यारीम डोंगर, म्हणजेच कसालोन त्याच्या उत्तरेकडल्या भागा जवळून गेली, आणि बेथशेमेशाकडे उतरून तिम्नाकडे गेली.

11मग ती सीमा एक्रोनाच्याबाजूस उत्तरेकडे गेली, आणि शिक्रोनापर्यंत सीमा गेली आहे; मग बाला डोंगराजवळून जाऊन यबनेलास गेली; ह्या सीमेचा शेवट समुद्रात होता.

12आणि पश्चिमेची सरहद्द महासमुद्रचा किनारा हीच सीमा होती, ही चहुंकडली सीमा यहुदाच्या वंशास त्यांच्या कुळाप्रमाणे जो विभाग मिळाला त्याची होती.

13आणि यहोशवाने परमेश्वराने सांगण्याप्रमाणे यफुन्नेचा पुत्र कालेब याला यहूदाच्या वंशाबरोबर वाटा दिला, त्याने किर्याथ आर्बा, म्हणजेच हेब्रोन, हे त्याला दिले; हा आर्बा अनाकाचा बाप होता.

14मग तेथून कालेबाने अनाकाच्या तीन मुले शेशय व अहीमान व तलमय म्हणजे अनाकाचे वंशज यांना वतनातून घालवले.

15नंतर तो तेथून दबीरात राहणाऱ्यावर चालून गेला; दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ सेफर होते.

16तेव्हा कालेब म्हणाला, जो किर्याथ सेफर लढून काबीज करून घेईल, त्याला मी आपली कन्या अखसा बायको करून देईन.

17तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज याचा पुत्र अथनिएल याने ते काबीज केले; यास्तव त्याने आपली कन्या अखसा त्याला बायको करून दिली.

18आणि ती त्याच्याकडे आली तेव्हा असे झाले की तिने आपल्या बापाजवळ शेत मागायाला त्याला गळ घातली, आणि ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला म्हटले, तुला काय पाहिजे?

19तेव्हा तिने म्ह्टले, मला आशीर्वाद द्या; कारण तुम्ही दक्षिण प्रदेशातील भूमी मला दिली आहे तर मला पाण्याचे झरेही द्या. त्याने तिला वरचे झरे व खालचे झरे दिले.

20यहूदाच्या संतानाचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे हेच आहे;

21यहुदाच्या वंशजांना दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील नगरे मिळाली ती ही; कबसेल व एदेर व यागूर;

22कीना व दीमोना व अदादा;

23आणि केदेश व हासोर व इथनान;

24जीफ व टेलेम व बालोथ;

25हासोर हदत्ता व करीयोथ हस्रोन (यालाच हासोरसुध्दा म्हणत)

26अमाम व शमा व मोलादा;

27आणि हसरगदा व हेष्मोन व बेथपेलेट;

28आणि हसरशुवाल व बैरशेबा व बिजोथा;

29बाला, ईयीम व असेम;

30आणि एल्तोलाद व कसील व हर्मा;

31आणि सिकलाग व मद्मन्ना व सन्सान्ना;

32आणि लवावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन; ही सर्व नगरे एकोणतीस व त्यांचे गांव.

33तळवटीतली नगरे ही, अष्टावोल, सरा व अषणा;

34जानोहा व एन गन्नीम तप्पूहा व एनाम;

35यर्मूथ व अदुल्लाम, सोखो व अजेका;

36आणि शारईम व अदीथइम व गदेरा व गदेरोथाईम, अशी चवदा नगरे, आणि त्यांचे गांव;

37सनान व हदाशा व मिग्दल गाद;

38दिलन, मिस्पा व यकथेल;

39लाखीश व बसकाथ व एग्लोन;

40कब्बोन व लहमामस व किथलीश;

41गदेरोथ बेथदागोन व नामा व मक्केदा; अशी सोळा नगरे, आणि त्यांचे गांव.

42लिब्ना व एथेर व आशान;

43इफ्ताह व अष्णा व नजीब;

44आणि कईला व अकजीब व मारेशा; अशी नऊ नगरे, आणि त्यांची गांवे.

45एक्रोन आणि त्याच्या उपनगरांसह त्याची गांवे;

46एक्रोनाजवळची आणि पश्चिमेची अश्दोदाची बाजूकडली सर्व वसाहत, त्याच्याजवळच्या खेडेगावासह.

47अशदोद, त्याच्या सभोवतीची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याच्यासभोवतीची उपनगरे आणि खेडी; मिसराचा ओहोळ व महासमुद्राच्या किनाऱ्यावरची नगरे.

48आणि डोंगरांळ प्रदेशातली नगरे ही, शामीर व यत्तीर व सोखो;

49दन्ना व किर्याथ सन्ना तेच दबीर;

50अनाब व एष्टमो व अनीम,

51आणि गोशेन व होलोन व गिलो. अशी ही अकरा नगरे, आणि त्याकडली खेडी,

52अरब व दुमा व एशान,

53यानीम व बेथतप्पूहा व अफेका,

54हुमटा व किर्याथ अर्बा तेच हेब्रोन व सियोर, अशी ही नऊ नगरे, आणि त्यांची खेडी.

55मावोन, कर्मेल व जीफ व युटा,

56इज्रेल व यकदाम व जानोहा,

57काइन, गिबा, व तिम्ना, ही दहा नगरे आणि त्यांची खेडी.

58हल्हूल, बेथसूर व गदोर,

59माराथ, बेथअनोथ व एलतकोन; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.

60किर्याथ बाल म्हणजेच किर्याथ यारीम व राब्बा ही दोन नगरे आणि त्यांची खेडी.

61रानांतली नगरे ही, बेथअराबा, मिद्दीन व सखाखा;

62आणि निबशान व मीठाचे नगर व एन गेदी; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.

63तथापि यरूशलेमात राहणाऱ्या यबूशी लोकांस यहूदाच्या वंशजाना घालवता आले नाही; यास्तव यबूशी यरुशालेमांत यहुदाच्या वंशजाजवळ आजपर्यंत राहत आहेत.



 <<  Joshua 15 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran