Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Isaiah 55 >> 

1अहो सर्व तान्हेल्यांनो, पाण्याजवळ या! आणि ज्याच्याजवळ पैसा नाही, सर्व या,विकत घ्या आणि खा! या, पैश्याशिवाय व मोलाशिवाय मद्य आणि दूध घ्या.

2जी भाकर नव्हे तिच्यासाठी तुम्ही चांदी का तोलून देता? आणि ज्याने समाधान होत नाही त्यासाठी श्रम कां करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि जे चांगले आहे ते खा व मिष्टान्नात तुमचे जीवन आनंदित होवो.

3तुम्ही कान द्या आणि माझ्याकडे या!ऐका, म्हणजे तुमचे जीवन जिवंत राहील! मी खरोखर तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, विश्वासाची कृती करून दावीदाशी करार केला.

4पाहा, मी त्याला राष्ट्रात साक्षी,लोकांचा अधिपती व सेनापती याप्रमाणे ठेवले आहे.

5पाहा, तू राष्ट्र ओळखत नाहीस अशा राष्ट्राला तू बोलावशील आणि ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुजकडे धाव घेईल. कारण परमेश्वर तुझा देव,इस्त्राएलाचा एक पवित्र, ज्याला तू गौरविले आहे याच्याकरता तुजकडे धाव घेतील.

6परमेश्वर सापडेल त्याकाळी त्याला शोधा; तो जवळ असतानाच त्याला बोलवा.

7दुष्ट आपला मार्ग व पापी मनुष्य आपले विचार सोडून देवो. तो परमेश्वराकडे माघारी येवो आणि तो त्यांच्यावर दया करील व तो आमच्या देवा येवो, तो त्यांना विपुलपणे क्षमा करील.

8कारण माझे विचार तुमचे विचार नाहीत, किंवा तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीत. हे परमेश्वराचे निवेदन आहे.

9कारण जसे आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझे विचार तुमच्या विचांरापेक्षा उंच आहेत.

10कारण जसे पाऊस आणि बर्फ आकाशातून खाली पडतात आणि पुन्हा भूमी भिजवल्याशिवाय आणि उत्पन्न करण्यास व अंकुर व पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय आकाशात परत जात नाही.

11तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द निरर्थक होऊन परत माझ्याकडे येणार नाही, परंतु जे मी इच्छीले ते पूर्ण करील आणि ज्यासाठी पाठविले ते यशस्वी होईल.

12कारण तुम्ही आनंदाने बाहेर जाल आणि शांतीने चालवले जाल; तुमच्यापुढे डोंगर आणि टेकड्या आनंदाने जयघोष करतील आणि शेतांतील सर्व झाडे आनंदाने टाळ्या वाजवतील.

13काटेरी झुडपाच्याऐवजी, सदाहरित वाढतील;आणि काट्याकुट्यांच्या जागी मेंदी उगवेल. आणि ते परमेश्वराच्या नावासाठी सर्वकाळचे चिन्ह होईल,ते कधीही नष्ट होणार नाही.



 <<  Isaiah 55 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran