Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Isaiah 41 >> 

1अहो द्वीपांनो,तुम्ही माझ्यापुढे शांत राहा;राष्ट्रे त्यांची शक्ति संपादन करोत; ते जवळ येवोत आणि बोलोत;चर्चा आणि वादविवाद करण्यास आपण एकमेकांजवळ येऊ.

2पूर्वेकडून येणाऱ्याला कोणी उठविले? त्याला त्याच्या क्रमाने चांगल्यासेवेसाठी कोणी बोलावले आहे? त्याने राष्ट्रे त्याच्यापुढे दिली आणि तो राजांवर अधिकार चालवीन असे केले; त्याने त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या आणि उडवलेल्या धसकटासारखे त्याच्या धनुष्याला दिले.

3तो त्यांचा पाठलाग करतो आणि ज्या जलद वाटेवर मोठ्या कष्टाने त्यांच्या पावलाचा स्पर्श होतो, ते सुरक्षित पार जातत.

4ही कृत्ये कोणी शेवटास आणि सिद्धीस नेली? सुरवातीपासून पिढ्यांना कोणी बोलाविले? मी, परमेश्वर, जो पहिला आणि जो शेवटल्यासह आहे तोच मी आहे.

5द्वीपे पाहतात आणि भितात; पृथ्वीच्या सीमा थरथर कापतात; त्या जवळ येतात आणि ये.

6प्रत्येकजण त्याच्या शेजाऱ्याला मदत करतो आणि प्रत्येकजण एक दुसऱ्याला म्हणतो,धीर धर.

7तेव्हा सुतार सोनाराला धीर देतो, आणि तो जो हातोड्याने काम करतो जो ऐरणीसह काम करतो, त्याला धीर देऊन सांधण्याविषयी, ते चांगले आहे.मग ते सरकू नये म्हणून चो ते खिळ्यांनी घट्ट बसवतो.”

8परंतु तू, इस्राएला, माझ्या सेवका, याकोबा, माझ्या निवडलेल्या,माझ्या मित्र,अब्राहाम याच्या संताना,

9मी तुला पृथ्वीच्या सीमांपासून परत आणले आणि मी तुला खूप लांबपासूनच्या दूर ठिकाणाहून बोलावले, आणि मी तुला म्हटले,तू माझा सेवक आहेस; मी तुला निवडले आहे आणि तुला नाकारले नाही.

10भिऊ नकोस,कारण मी तुझ्याबरोबर आहे. चिंतातुर होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देईन आणि मी तुला मदत करीन,आणि मी तुला आपल्या विजयाच्या उचित उजव्या हाताने तुला आधार देईन.

11पाहा,जे सर्व तुझ्यावर रागावले आहेत ते लज्जित व फज्जित होतील; जे तुला विरोध करतात ते काहीच नसल्यासारखे होतील आणि नष्ट होतील.

12जे तुझ्याबरोबर भांडण करतात त्यांचा शोध तू करशील आणि तरी ते तुला सापडणार नाहीत. जे तुझ्याविरूद्ध लढाई करतात ते शून्यवत, काहीच नसल्यासारखे होतील.

13कारण मी, परमेश्वर तुझा देव, तुझा उजवा हात धरतो, मी तुला सांगतो: घाबरू नकोस; मी तुला मदत करीन.

14हे किटका,याकोबा,आणि इस्त्राएलाच्या माणसा; मी तुम्हाला मदत करील हे परमेश्वराच निवेदन आहे,इस्त्राएलाचा एक पवित्र,तुमचा उद्धारक आहे.

15पाहा,मी तुला नवीन व दुधारी, मळणीच्या घणाप्रमाणे करीत आहे; तू डोंगर मळून आणि त्यांचे पीठ करशील; तू टेकडयांना भुसांप्रमाणे करशील.

16तू त्यांना उफणशील आणि वारा त्यांना वाहून दूर नेईल;वावटळ त्यांना विखरील.

17खिन्न झालेले आणि गरजवंत पाण्याचा शोध घेतात, पण तेथे काहीच नाही आणि त्यांची जीभ तहानेने कोरडी पडली आहे; मी परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देईल; मी, इस्राएलाचा देव, त्यांना सोडणार नाही.

18मी उतरणीवरून खाली प्रवाह आणि दऱ्यांमधून झऱ्याचे पाणी वाहायला लावीन; मी वाळवंटात पाण्याचे तळे आणि शुष्क भूमीवर पाण्याचे झरे वाहतील.

19मी रानात गंधसरू, बाभूळ, व मेंदीचे, जैतून वृक्ष वाढतील. मी वाळवंटात देवदारू,भद्रदारू आणि सरू एकत्र वाढण्यास कारण करील.

20मी हे यासाठी करील की,लोकांनी पाहावे,ओळखावे आणि एकत्रित समजावे, परमेश्वराच्या हाताने हे केले आहे,इस्त्राएलाचा एक पवित्र ज्याने हे उत्पन्न केले आहे.

21परमेश्वर म्हणतो, आपला वाद पुढे आणा; याकोबाचा राजा म्हणतो,आपल्या मूर्तींसाठी आपले उत्तम वादविवाद पुढे आणा.

22त्यांनी आपले वादविवाद आमच्याकडे आणावे; त्यांनी पुढे यावे आणि काय घडणार आहे ते सांगावे, पूर्वीच्या होणाऱ्या गोष्टी आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही त्यावर काळजीपूर्वक विचार करू आणि त्याची परिपूर्तता कशी होईल ते जाणू. म्हणजे ह्यागोष्टी आम्हाला चांगल्या कळतील.

23भविष्यात होणाऱ्या गोष्टीविषयी सांगा,म्हणजे जर तुम्ही देव असाल तर आम्हाला समजेल; काही तरी चांगले किंवा वाईट करा,म्हणजे आम्ही विस्मीत आणि प्रभावीत होऊ.

24पाहा, तुमच्या मूर्ती आणि तुमचे कृत्ये काहीच नाहीत; जो कोणी तुम्हाला निवडतो तो तिरस्करणीय आहे.

25“मी उत्तरेपासून एकाला उठविले आहे आणि तो आला आहे;तो सूर्याच्या उगवतीपासून जो माझे नावाने हाक मारतो त्याला मी बोलावून घेतो, आणि तो चिखलाप्रमाणे सत्ताधाऱ्यास तुडविल, जसा कुंभार चिखल पायाखाली तुडवतो तसा त्यांना तुडविल.”

26आम्हास कळावे, म्हणून पहिल्यापासून कोणी जाहीर केले? आणि त्यावेळेपूर्वी आम्ही असे म्हणावे, तो योग्य आहे? खरोखर त्यांनी काहीच सांगितले नाही,होय,तू सांगितलेले कोणीच ऐकले नाही.

27मी सियोनेला प्रथम म्हणालो,पाहा,ते येथे आहेत; मी यरुशलेमेकडे अग्रदूत पाठविला आहे.

28जेव्हा मी पाहिले, तेथे कोणी नाही,मी त्यांना विचारले असता, एका शद्बाने तरी उत्तर देऊ शकेल असा त्यांच्यामध्ये कोणीही नाही, एक चांगला सल्ला देऊ शकेल असा कोणी नाही.

29पाहा,त्यातले सर्व काहीच नाहीत, आणि त्यांची कृत्ये काहीच नाहीत; त्यांच्या धातूच्या ओतीव प्रतिमा वारा आणि शून्यताच आहेत.



 <<  Isaiah 41 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran