Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Isaiah 35 >> 

1निर्जन आणि अराबाह आनंदी होईल; आणि निर्जल आनंद देईल आणि गुलाबासारखा बहरेल.

2ते विपुलतेने बहरेल आणि हर्ष व गायन करून आनंद करतील; त्याला लबानोनाचे वैभव, कर्मेल व शारोन याचे सौदर्य दिले जाईल; ते परमेश्वराचे गौरव, आमच्या देवाचे सौदर्य पाहतील.

3दुर्बल हातांना बळकट करा आणि थरथर कापणारे गुडघे घट्ट करा.

4जे भिणाऱ्या हृदयाचे आहेत त्यांना म्हणा, “सामर्थ्यवान व्हा. भीऊ नका!” पाहा, तुमचा देव अपेक्षपेक्षा मोठ्या प्रमाणात, देवाच्या भरपाईसह येईल. तो येईल आणि तुम्हाला तारील.

5मग आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान ऐकतील.

6नंतर लगंडे हरिणाप्रमाणे उड्या मारील आणि मुक्याची जीभ गाणे गाईल. अराबाहून पाण्याचे झरे आणि निर्जन प्रदेशातून पाण्याचे प्रवाह वाहतील.

7मृगजले तलाव आणि तहानलेली जमीन पाण्याचे झरे होईल; कोल्हे राहण्याच्या जागी जेथे ते एकदा निजले, त्याजागी बोरू व लव्हाळे यासहित गवत उगवेल.

8तेथील महामार्गाला पवित्रेचा मार्ग असे म्हणतील. अशुद्ध त्यात चालणार नाहीत. परंतु जे त्याच्यावर चालतील तो त्यांच्यासाठी आहे. कोणी मूर्ख त्याच्यावरून जाणार नाही.

9तेथे सिंह नसतील, हिंस्त्र श्वापदे त्यावर चढणार नाहीत; ते तेथे सापडणार नाहीत, परंतु तेथे उद्धारलेले चालतील.

10परमेश्वराने खंडून घेतलले माघारी येतील आणि ते सियोनात गायन करीत आणि त्यांच्या मस्तकावर सदासर्वकाळ राहणारा आनंद राहील; आनंदाने व हर्षांने ते भरून जातील; दु:ख आणि शोक दूर पळून जातील.



 <<  Isaiah 35 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran