Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Ezekiel 9 >> 

1तेव्हा त्यांनी मोठ्या आवाजाने मला हाक मारली, आणि म्हणून शहर रक्षकाला येऊ द्या, हल्ला व हानी करणारे हत्यार त्यांच्या हाती घेऊन येऊ द्या.

2पहा! उत्तरे दिशेने प्रवेश व्दारातून सहा जण आपल्या हाती जनावर ठार करणारे हत्यार आणि अंगात तागाचे वस्त्र, एका बाजुस शास्त्र्यांचे उपकरण होते. ते जाऊन पितळेच्या वेदीजवळ उभे राहीले.

3मग इस्त्राएलाच्या देवाचे गोरवी तेज करुबा वरुन निघून जेथे होते घराच्या उंबरठ्यावर आले. त्याने तागाचे वस्त्र परीधान केलेले ज्यांच्या हाती एका बाजुला शास्त्र्यांचे उपकरण होते त्यांना बोलावले.

4यहोवा देव त्यांना म्हणाला यरुशलेमेच्या मध्य भागातुन प्रवेश करा, जे पुरुष विव्हळ झाले त्यांच्या माथ्यावरवर खुण करा आणि शहरात केलेला सगळ्या अपवित्र गोष्टीसाठी उसासा टाका.

5ऐकायला जाईल अशा अंतरावर मग तो बोलला शहरात त्यांनंतर प्रवेश कर व मारुन टाक, कुणावरही दया करु नकोस.

6म्हातारे असो, तरुण, कुमारी, लहान मुले किंवा स्त्रिया सर्वांना मारुन टाक! पण ज्याच्या माथ्यावर खुण आहे त्याच्या जवळ जाऊ नको. माझ्या पवित्र ठिकाणाहुन सुरुवात कर! मग ते म्हाताऱ्यापासून सुरुवात करतील जे माझ्या निवासापुढे आहेत.

7तो त्यांना म्हणाला, “आक्रमण कर घरे ध्वस्त करा आणि वेशी म्रुतांना व्यापून टाका” मग ते नगराच्या बाहेर जाऊन हल्ला करतील.

8ते हल्ला करीत असतांना, मला स्वताःला एकटे वाटले आणि मी उपडा पडुन रडलो, हे प्रभु यहोवा देवा तुझ्या क्रोधाच्या ओतणीने तू सर्व उरलेल्या यरुशलेमातील इस्त्राएलाचा विध्वंस करशील काय?

9तो मला म्हणाला “इस्त्राएल आणि यहूदाचे अपराध फार वाढत आहे, शहर व भुमी रक्ताने भरलेली आहे आणि ते दुरुपयोग करून म्हणतात यहोवा देव आम्हाला विसरला तो आम्हाला बघत नाही!

10म्हणून मी त्यांच्यावर दया द्रुष्टी करणार नाही त्यांची दया करणार नाही. त्यांवर त्यांच्या क्रुत्यांचे फळ त्यांच्या माथी देईन.”

11पहा! तागाचे वस्त्र घातलेला शास्त्र्याचे अवजार हाती घेऊन वापस येत असता त्याने बातमी दिली, “तू मला सांगीतलेले सर्व काही पार पाडले आहे.”



 <<  Ezekiel 9 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran