Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 97 >> 

1परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी आनंदीत होवो. अनेक द्वीपसमूह आनंदीत होवो.

2ढग आणि काळोख त्याच्याभोवती आहेत. नीति व न्याय त्याच्या सिंहासनाचा पाया आहेत.

3अग्नी त्याच्यापुढे चालतो आणि प्रत्येक बाजूने त्याच्या शत्रूंना नष्ट करून टाकतो.

4त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले; हे पृथ्वीने पाहून आणि थरथर कापली.

5परमेश्वरासमोर,सर्व पृथ्वीच्या प्रभुसमोर पर्वत मेणासारखे वितळले.

6आकाशांने, त्याचा न्याय जाहीर केला, आणि सर्व राष्ट्रांनी त्याचे वैभव पाहिले.

7जे कोरीव मूर्तीची पूजा करतात, जे मूर्तिचा अभिमान बाळगतात ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व देवहो त्याच्यासमोर नमन करा.

8सियोनेने हे ऐकले आणि आनंदित झाली, कारण हे परमेश्वरा, तुझ्या न्यायामुळे यहूदाच्या नगरांनी आनंद केला.

9कारण हे परमेश्वरा, सर्व पृथ्वीवर तू परात्पर आहेस. तू सर्व देवापेक्षा खूपच उंचावलेला आहेस.

10जे तुम्ही परमेश्वरावर प्रीति करता,ते तुम्ही वाईटाचा द्वेष करा, तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करतो आणि तो त्यास दुष्टांच्या हातातून सोडवतो.

11नीतिमानासाठी प्रकाश आणि जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे.

12अहो नीतिमानांनो, परमेश्वराठायी आनंदी व्हा. त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या.



 <<  Psalms 97 >> 


Bible2india.com
© 2010-2026
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran