Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 96 >> 

1अहो,परमेश्वराला नवीन गीत गा; हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर.

2परमेश्वराला गाणे गा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या; दिवसेदिवस त्याच्या तारणाची घोषणा करा.

3राष्ट्रात त्याचे गौरव, त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांची सर्व राष्ट्रात जाहीर करा.

4कारण परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे. सर्व दुसऱ्या देवांपेक्षा त्याचे भय धरणे योग्य आहे.

5कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ति आहेत, पण परमेश्वराने तर स्वर्ग निर्माण केला.

6वैभव व ऐश्वर्य त्याच्या सान्निध्यात आहेत. सामर्थ्य आणि सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत.

7अहो तुम्ही लोकांच्या कुळांनो, परमेश्वराचे गौरव करा; परमेश्वराचे गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य सांगा.

8परमेश्वराच्या नावामुळे त्याचा गौरव करा. अर्पण घेऊन व त्याच्या अंगणात या.

9पवित्रतेने सुशोभित होऊन परमेश्वराला नमन करा. हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो.

10राष्ट्रांमधील लोकांना सांगा की, परमेश्वर राज्य करतो. जगसुद्धा स्थिर स्थापिलेले आहे;ते हलविता येणे अशक्य आहे. तो सरळपणे लोकांचा न्याय करील.

11आकाश आनंदित होवो, आणि पृथ्वी आनंदोत्सव करो; समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत.

12शेत आणि त्यातील सर्वकाही आनंदोत्सव करोत. मग जंगलातील सर्व वृक्ष आनंदाने गजर करतील.

13परमेश्वरापुढे, कारण तो येत आहे; पृथ्वीचा न्याय करायला तो येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा व त्याच्या सत्यतेने लोकांचा न्याय करील.



 <<  Psalms 96 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran