Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 95 >> 

1याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू; आपल्या तारणाचा खडक त्याचा हर्षाने जयजयकार करू.

2उपकारस्तुती करीत त्याच्या सान्निध्यात प्रवेश करू; स्तुतिचे स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.

3कराण परमेश्वर महान देव आहे आणि सर्व देवांहून तो श्रेष्ठ महान राजा आहे.

4त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थाने आहेत; पर्वताची उंच शिखरेही त्याचीच आहेत.

5समुद्र त्याचाच आहे,कारण त्यानेच तो निर्माण केला आणि त्याच्या हाताने कोरडी भूमी घडवली.

6याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू, त्याची उपासना करू,त्याला नमन करू;

7कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणातील लोक आणि त्याच्या हातातील मेंढरे आहोत. आज जर त्याचा तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल.

8मरीबा येथल्याप्रमाणे किंवा मस्साच्या दिवशी रानात केले तसे आपली मने कठीण करू नका,

9तेव्हा तुमच्या वडिलांनी माझ्या अधिकाराला आव्हान दिले आणि जरी त्यांनी माझी कृती पाहिली होती, तरी माझ्या सहनशीलतेची परीक्षा केली.

10चाळीस वर्षे त्या पिढीवर मी रागावलो आणि म्हणालो, हे बहकलेल्या मनाचे आहेत त्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत.

11म्हणून मी आपल्या रागात शपथ वाहिली की, हे माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.



 <<  Psalms 95 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran