Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 91 >> 

1जो परात्पराच्या आश्रयात राहतो तो सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील.

2मी परमेश्वराविषयी म्हणेल की, “तो माझा आश्रय आणि माझा किल्ला आहे, माझा देव, ज्यावर मी विश्वास ठेवतो.”

3कारण तो तुला पारध्याच्या पाशातून आणि नाश करणाऱ्या मरीपासून तुला सोडवील.

4तो तुला आपल्या पंखानी झाकील, आणि तुला त्याच्या पंखाखाली आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे.

5रात्रीच्या दहशतीचे भय किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला,

6किंवा अंधारात फिरणाऱ्या मरीला किंवा भर दुपारी नाश करणारी पटकीला तू भिणार नाहीस.

7तुझ्या एका बाजूला हजार पडले आणि तुमच्या उजव्या हातास दहा हजार पडले, पण तरी ती तुझ्याजवळ येणार नाही.

8तू मात्र निरीक्षण करशील आणि दुष्टांना झालेली शिक्षा पाहशील.

9कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्परालासुद्धा आपले आश्रयस्थान केले आहेस.

10तुमच्यावर वाईट मात करणार नाही. तुमच्या घराजवळ कोणतीहि पिडा येणार नाही.

11कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची, तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.

12ते तुला आपल्या हातांनी उचलून धरतील अशासाठी की,तू घसरून आणि दगडावर पडू नये.

13तू आपल्या पायाखाली सिंह आणि नागाला चिरडून टाकशील; तू सिंह व अजगर ह्याला तुडवीत चालशील.

14तो माझ्याशी निष्ठावान आहे,म्हणून मी त्याला सोडवीन; मी त्याला सुरक्षित ठेवीन कारण तो माझ्याशी प्रामाणिक आहे.

15जेव्हा तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याबरोबर राहीन; मी त्याला विजय देईन आणि त्याचा सन्मान करीन.

16मी त्याला दीर्घायुष्य देईन आणि त्याला माझे तारण दाखवीन.



 <<  Psalms 91 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran