Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 87 >> 

1परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे.

2याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वराला सियोनचे द्वार अधिक प्रिय आहे.

3हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

4राहाब आणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन. पाहा,पलेशेथ,सोर व कूश म्हणतात त्यांचा जन्म तेथलाच.

5सियोनेविषयी असे म्हणतील की,हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता; आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.

6लोकांची नोंदणी करताना ह्याचा जन्म तेथलाच होता असे परमेश्वर लिहील.

7गायन करणारे आणि वाद्ये वाजवणारेही म्हणतील की, माझ्या सर्व पाण्याचे झरे तुझ्यात आहेत. ”



 <<  Psalms 87 >> 


Bible2india.com
© 2010-2026
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran