Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 82 >> 

1देव दैवी मंडळीत उभा आहे, तो देवांच्या मध्ये न्याय देतो.

2कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल? आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल?

3गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे; त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा.

4त्या गरीब व गरजवंताना बचाव करा. त्यांचे दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा.

5“ते जाणत नाहीत किंवा समजत नाही; ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात; पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत.”

6मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात.”

7तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल आणि एखाद्या सरदारासारखे तुम्ही पडाल.

8हे देवा, ऊठ! पृथ्वीचा न्याय कर, कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील.



 <<  Psalms 82 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran