Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 81 >> 

1देव जो आमचे सामर्थ्य,त्याला मोठ्याने गा; याकोबाच्या देवाचा आनंदाने जयजयकार करा.

2गाणे गा आणि डफ वाजवा, मंजुळ वीणा व सतार वाजवा.

3नव चंद्रदर्शनाला, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवसाची सुरवात होते त्या दिवशी एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.

4कारण हा इस्राएलासाठी नियम आहे. हा याकोबाच्या देवाने दिलेला विधी आहे.

5जेव्हा तो मिसर देशाविरूद्ध गेला, तेव्हा त्याने योसेफामध्ये त्याने साक्षीसाठी हा नियम लावला. तेथे मला न समजणारी भाषा मी ऐकली.

6मी त्याच्या खांद्यावरचे ओझे काढून टाकले आहे; टोपली धरण्यापासून त्याचे हात मोकळे केले आहेत.

7तू संकटात असता आरोळी केली, आणि मी तुला मदत केली; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थळातून उत्तर दिले; मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.

8अहो माझ्या लोकांनो, माझे ऐका, कारण मी तुम्हाला सूचना देतो, हे इस्राएला जर तू मात्र माझे ऐकशील तर बरे होईल.

9तुझ्यामध्ये परके देव नसावेत; तू कोणत्याहि परक्या देवाची उपासना करू नकोस.

10मीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले. तू आपले तोंड चांगले उघड आणि मी ते भरीन.

11परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही; इस्राएलाने माझी आज्ञा पाळली नाही.

12म्हणून मी त्यांना त्यांच्या हटवादी मार्गाने वागू दिले अशासाठी की जे त्यांच्या दृष्टीने योग्य आहे ते त्यांनी करावे.

13अहा,जर माझे लोक माझे ऐकतील; अहा, जर माझे लोक माझ्या मार्गाने चालतील तर बरे होईल!

14मग मी त्यांच्या शत्रूंचा त्वरेने पराभव करीन आणि अत्याचार करणाऱ्याविरूद्ध आपला हात फिरवीन.

15परमेश्वराचा द्वेष करणारे भीतीने त्याच्यापुढे दबून जातील. ते सर्वकाळ अपमानीत राहतील.

16मी इस्राएलास उत्तम गहू खाण्यास देईल; मी तुला खडकातल्या मधाने तृप्त करील.



 <<  Psalms 81 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran