Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 75 >> 

1देवा, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तू जवळ आहेस आणि लोक तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगतात.

2देव म्हणतो “मी न्यायदानाची वेळ निवडली, मी बरोबर न्याय करीन.

3पृथ्वी आणि तिच्यावरील सारे काही थरथर कापेल आणि पडायला येईल पण मी त्याला स्थिरता देईन.”

4“काही लोक गर्विष्ठ असतात. ते शक्तीशाली आणि महत्वपूर्ण आहेत असे त्यांना वाटते, परंतु मी त्यांना सांगतो,

5‘फुशारक्या मारु नका. एवढे गर्विष्ठ बनू नका.’

6या पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीला मोठा बनवू शकेल अशी कोणतीही शक्ती नाही.

7देव न्यायाधीश आहे. कोणी मोठे व्हायचे ते देवच ठरवतो. देव एखाद्याला वर उचलतो आणि त्याला मोठे बनवतो. देव एखाद्याला खाली उतरवतो आणि त्याला मोठा करत नाही.

8देव दुष्टांना शासन करण्यास तयार आहे. परमेश्वराच्या हातात पेला आहे. तो पेला विषयुक्त द्राक्षारसाने भरलेला आहे. तो तो द्राक्षारस ओतेल आणि दुष्ट लोक तो शेवटच्या थेंबापर्यंत पितील.

9मी नेहमी लोकांना याबद्दल सांगेन. मी इस्राएलाच्या देवाचे गुणगान करीन.

10मी दुष्टांकडून सत्ता काढून घेईन आणि मी चांगल्या लोकांकडे सत्ता देईन.



 <<  Psalms 75 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran