Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 72 >> 

1देवा, तू राजाला तुझ्यासारखे योग्य निर्णय घेण्यासाठी मदत कर. आणि राजाच्या मुलाला तुझ्या चांगुलपणा विषयी शिकायला मदत कर.

2तुझ्या लोकांना चांगला न्याय मिळावा म्हणून राजाला मदत कर तुझ्या गरीब लोकांसाठी चांगले आणि शहाणपणाचे निर्णय घेण्यासाठी त्याला मदत कर.

3पृथ्वीवर सगळीकडे शांती आणि न्याय नांदू दे.

4राजाला गरीबांविषयी न्यायी राहू दे. त्याला असहाय्य लोकांना मदत करु दे. त्यांना जे त्रास देतात त्या लोकांना त्याला शिक्षा करु दे.

5जो वर सूर्य चमकतो आहे आणि चंद्र आकाशात आहे तोवर लोकांनी राजाला मान द्यावा आणि त्याची भीती बाळगावी असे मला वाटते. लोक त्याला सदैव मान देतील आणि त्याची भीती बाळगतील अशी आशा मी करतो.

6राजाला शेतात पडणाऱ्या पावसासारखे असू दे त्याला पृथ्वीवर पडणाऱ्या पर्जन्यासारखे असू दे.

7तो जोपर्यंत राजा आहे तोपर्यंत चांगुलपणा उमलू दे. जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत शांती नांदू दे.

8त्याचे राज्य एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत आणि युफ्रेटस नदीपासून पृथ्वीच्या दुसऱ्या टोकापर्यत वाढू दे.

9वाळवंटात राहाणाऱ्या सर्व लोकांना त्याच्यासमोर मुजरे करु दे. त्याच्या सर्व शत्रूंना त्याच्यापुढे घाणीत तोंड घालून मुजरे करु दे.

10तार्शीशच्या आणि दूरदूरच्या देशांच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणू दे. शबा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी खंडणी आणू दे.

11सगळ्या राजांना आमच्या राजासमोर मुजरे करु दे सगळी राष्ट्रे त्याच्या सेवेत राहू दे.

12आमचा राजा असहाय्याला मदत करतो. आमचा राजा गरीब आणि असहाय्य लोकांना मदत करतो.

13गरीब आणि असहाय्य लोक त्याच्यावर अवलंबून असतात. राजा त्यांना जिवंत ठेवतो.

14जे दुष्ट लोक त्यांना दु:ख द्यायचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून राजा त्यांना वाचवतो. राज्याला त्या गरीबांचे आयुष्य खूप मोलाचे वाटते.

15राजा चिरायु होवो! आणि त्याला शबाकडून सोने मिळू दे. राज्यासाठी नेहमी प्रार्थना करा, त्याला रोज आशीर्वाद द्या.

16शेतात खूप धान्य पिकू द्या, डोंगरावरही खूप धान्य उगवू द्या. शेती लबानोन मधील शेतीसारखी सुपीक होऊ द्या आणि शहरे गवताने भरलेल्या शेतासारखी माणसांनी भरु द्या.

17राजाला सदैव प्रसिध्द होऊ द्या. जोपर्यंत सूर्य तळपतो आहे तो पर्यत लोकांना त्याची आठवण राहू द्या. त्याला लोकांना आशीर्वाद देऊ द्या आणि लोकांना त्याला आशीर्वाद देऊ द्या.

18परमेश्वर देवाची, इस्राएलाच्या देवाची स्तुती करा. फक्त देवच अशा अद्भूत गोष्टी करु शकतो.

19त्याच्या गौरवपूर्ण नावाची सदैव स्तुती करा. त्याच्या गौरवाने सारे जग भरु द्या. आमेन आमेन.

20इशायाचा मुलगा दावीद याच्या प्रार्थना इथे संपल्या.



 <<  Psalms 72 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran