Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 67 >> 

1देवा, मला दया दाखव आणि आशीर्वाद दे. कृपाकरुन आमच्या स्विकार कर!

2देवा, पृथ्वीवरील प्रत्येक माणूस तुझ्या मार्गाविषयी समजून घेईल अशी मी आशा करतो. तू लोकांना कसा तारतोस ते प्रत्येक देशाला बघू दे.

3देवा, लोक तुझी स्तुती करु देत, सर्व लोक तुझी स्तुती करु देत.

4सगळ्या राष्ट्रांना हर्ष होऊ दे आणि ते सुखी होऊ दे. का? कारण तू लोकांचा योग्य रीतीने न्याय करतोस आणि तू प्रत्येक देशावर राज्य करतोस.

5देवा, लोक तुझी स्तुती करोत, सर्व लोक तुझी स्तुती करोत.

6देवा, आमच्या देवा, आम्हाला आशीर्वाद दे. आमची जमीन आम्हाला खूप पीक देवो.

7देव आम्हाला आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व लोक देवाला घाबरोत आणि त्याला मान देवोत.



 <<  Psalms 67 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran