Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 66 >> 

1पृथ्वीवरील सारे काही आनंदाने देवाचा जयजयकार करीत आहे.

2देवाच्या गौरवी नावाचा जयजयकार करा. स्तुतिगीतांनी त्याचा सन्मान करा.

3त्याचे काम किती आश्चर्यजनक आहे, चांगले आहे ते त्याला सांगा. देवा, तुझी शक्ती महान आहे तुझे शत्रू तुझ्यापुढे नतमस्तक होतात. ते तुला घाबरतात.

4सगळ्या जगाला तुझी उपासना करु दे प्रत्येकाला तुझ्या नावाचा महिमा गाऊ दे.

5देवाने केलेल्या गोष्टी बघा त्या गोष्टी आम्हाला आश्चर्यचकित करतात.

6देवाने समुद्राचे कोरडे वाळवंट बनवले त्याची आनंदी माणसे चालत नदीच्या पलिकडे गेली.

7देव त्याच्या महान शक्तिमुळे जगावर राज्य करतो देव सगळीकडच्या लोकांवर लक्ष ठेवतो, त्याच्याविरुध्द कुणीही बंड करु शकत नाही.

8लोकहो! आमच्या देवाची स्तुती करा. त्याची स्तुती करणारी गीते मोठ्याने गा.

9देवाने आम्हाला जीवन दिले. देव आम्हाला संरक्षण देतो.

10लोक चांदीची अग्नी परीक्षा करतात तशी देवाने आमची परीक्षा पाहिली.

11देवा, तू आम्हाला सापळ्यात अडकू दिलेस. तू आमच्यावर जड ओझी लादलीस.

12तू आमच्या शत्रूंना आमच्यावरुन चालू दिलेस. तू आम्हाला पाण्यातून आणि आगीतून फरफटत नेलेस. परंतु तू आम्हाला सुरक्षित ठिकाणी आणलेस.

13म्हणून मी तुझ्या मंदिरात तुला होमबली अर्पण करण्यासाठी बळी घेऊन येईन.

14मी संकटात होतो तेव्हा तुझ्याकडे मदत मागितली. मी तुला अनेक वचने दिली, आता मी वचन दिल्याप्रमाणे तुला त्या गोष्टी देत आहे.

15मी तुला पापार्पण करीत आहे. मी तुला धुपासहीत मेंढ्या अर्पण करीत आहे. मी तुला बैल आणि बोकड अर्पण करीत आहे.

16देवाची उपासना करणाऱ्यांनो, इकडे या. देवाने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हाला सांगतो.

17मी त्याची प्रार्थना केली, मी त्याची स्तुती केली.

18माझे मन शुध्द होते म्हणून माझ्या प्रभुने माझे ऐकले.

19देवाने माझे ऐकले. त्याने माझी प्रार्थना ऐकली.

20देवाची स्तुती करा देव माझ्यापासून दूर गेला नाही. त्याने माझी प्रार्थना ऐकली. देवाने मला त्याचे प्रेम दाखवले.



 <<  Psalms 66 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran