Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 64 >> 

1देवा, माझे ऐक, माझ्या शत्रूंनी मला घाबरविले आहे. त्यांच्यापासून मला वाचव.

2माझे माझ्या शत्रूंच्या गुप्त योजनांपासून रक्षण कर. त्या दुष्ट लोकांपासून मला लपव.

3त्यांनी माझ्याबद्दल अगदी वाईट खोटं सांगितले आहे. त्यांच्या जिभा धारदार तलवारी सारख्या आहेत. त्यांचे कटू शब्द बाणाप्रमाणे आहेत.

4ते लपून बसतात आणि त्यांचे बाण एका साध्याभोळ्या आणि प्रामाणिक माणसावर फेकतात.

5वाईट करण्यासाठी ते एकमेकांना प्रोत्साहन देतात व सापळे रचण्याबाबत चर्चा करतात. “आपले सापळे कोणीही बघणार नाही” असे ते एकमेकांना सांगतात.

6लोक अतिशय कुटिल असू शकतात. लोक काय विचार करतात ते कळणे अवघड आहे.

7परंतु देवदेखील त्याचे “बाण” मारु शकतो आणि त्यांना काही कळण्या आधीच वाईट लोक जखमी होतात.

8वाईट लोक इतर लोकांना त्रासदायक गोष्टी करण्याच्या योजना आखतात. परंतु देव त्यांच्या योजना निष्फळ बनवतो आणि त्या त्रासदायक गोष्टी त्यांच्याच वाट्याला येतील असे करतो. आणि नंतर जो कोणी त्यांना पाहातो तो मस्तक विस्मयाने हलवतो.

9देवाने काय केले ते लोक पाहातील. ते इतरांना देवाबद्दल सांगतील, त्यामुळे सगळ्यांना देवाबद्दल अधिक काही कळेल आणि त्याला आदर देण्याचे ही त्यांना कळेल.

10परमेश्वराची सेवा करण्यास चांगल्या व्याक्तिला आनंद वाटतो. तो देवावर विसंबून राहातो. चांगल्या प्रामाणिक लोकांनी हे पाहिल्यावर ते देवावर विश्वास ठेवतात.



 <<  Psalms 64 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran